अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधार पदाचा मानकरी राहिला आहे. तर त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चमकदार कामगिरी करत आयपीएल 2022 (IPL 2022) चे विजेतेपद पटकावले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने या टी-20 लीगमध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या खेळाकडे लागल्या होत्या. (Natasha Stankovic became emotional Hardik Pandya comforted her)
विशेषतः गोलंदाजीवर नजरा टिकल्या होत्या. मात्र, हार्दिकने चांगली कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असं म्हणायला हरकत नाही. हार्दिक जखमी झाल्यावर त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने (Nataša Stanković) पांड्याचे मनोबल वाढवले. आता हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले, तेव्हा नताशा खूपच भावूक झाल्याचे दिसून आली होती. नताशा आणि हार्दिकचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धूमाकूळ घालत आहे.
गुजरात टायटन्स चॅम्पियन होताच नताशा मैदानवर आली होती. तिने पती हार्दिक पंड्याला त्यावेळी मिठी मारली. यावेळी नताशा भावूक झाल्याचे दिसून आले. मात्र, नंतर हार्दिक तिचे सांत्वन करताना दिसला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 130 धावांवरतीच रोखले. यानंतर त्यांनी 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि हार्दिकने इतिहास रचला. कर्णधारपदाच्या पहिल्या सत्रात आयपीएलचे जेतेपद पटकावण्याच्या बाबतीत हार्दिक पांड्याने 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवणाऱ्या दिवंगत कर्णधार शेन वॉर्नची (Shane Warne) बरोबरी केली.
IPL 2022 हा हार्दिक पांड्यासाठी पुनरागमनाचा हंगाम ठरला म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात गोलंदाजी न केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात होती. T20 विश्वचषकानंतर तो एकही सामना न खेळता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आला. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल सर्वांना शंका होत्या. पण या सर्व गोष्टींना मागे टाकत हार्दिकने आयपीएलच्या या हंगामात फलंदाजीसोबतच शानदार गोलंदाजी केली तर फायनलमध्ये त्याने 3 महत्त्वाच्या विकेट आपल्या नावावर केल्या.
आयपीएलच्या 15 व्या मोसमात हार्दिक पांड्याने एकूण 487 धावा केल्या, जे या हंगामात गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक राहिल्या आहेत. हार्दिकने 15 सामन्यांमध्ये 131 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 44 पेक्षा जास्त राहिली आहे. हार्दिकने चार अर्धशतके झळकावत 8 विकेट्स आपल्या नावावरती केल्या आहेत. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर हार्दिकचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.