Football
Football Dainik Gomantak

कळंगुट व्हेटरन्स ‘टायगर कप’चे मानकरी

अंतिम लढत: बार्देशवर तीन गोलने मात, बिबियान, ऑल्विनची चमक
Published on

पणजी: कळंगुट व्हेटरन्सने बार्देशवर 3-0 फरकाने सफाईदार विजय नोंदवत टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत व्हेटरन्स गटात विजेतेपद मिळविले. अंतिम सामना रविवारी कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर झाला. बिबियान फर्नांडिस व ऑल्विन फर्नांडिस यांनी गोल नोंदवून विजयी संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. (Calangute Veterans won the Tiger Cup)

सामन्यातील पहिला गोल 30 व्या मिनिटास बिबियान याने नोंदविला. नंतर ऑल्विन याने दोन गोल नोंदवून कळंगुटच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने अनुक्रमे 40 व्या व 48 व्या मिनिटास गोल केला. गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीतर्फे स्पर्धा घेण्यात आली.

Football
जोस बटलरच्या 824 धावांची गुजरात टायटन्सला भीती नाही; कारण...

बार्देशचा आलेक्स आल्वारिस अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. त्याला साळगावकर एफसीचे माजी खेळाडू दिगंबर हळदणकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. बार्देशचाच विक्रांत शर्मा स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ठरला. त्याने जेनेव्हिव फर्नांडिस यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला. कळंगुट व्हेटरन्सचा बिबियान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीचे अध्यक्ष फाबियान डिसोझा यांनी पुरस्कार दिला. विजेत्या कळंगुटला 60,000 रुपये व करंडक, तर उपविजेत्या बार्देशला 40,000 रुपये व करंडक देण्यात आला. ही दोन्ही बक्षिसे भारतीय फुटबॉल प्रशिक्षक संघटनेचे संचालक दिनेश नायर यांच्या हस्ते देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com