Namibia Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC: नामिबियाचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सचिनच्या प्रतिक्रियेवर नामिबियाच्या कप्तानचे उत्तर

नामिबियाविरोधात पराभव झाल्याने श्रीलंकेला धक्का बसला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषकाला (T20 World Cup) रविवारपासून सुरूवात झाली. पात्रता फेरीतील पहिलाच श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामिबियाने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला असून, श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 19 षटकांत 108 धावांवर आटोपला.

नामिबियाच्या विजयाने क्रिकेट विश्वात अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी नामिबियाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील नामिबिया संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. "नाम तो सुना ही होगा" नामिबिया संघाने श्रीलंकेविरोधात उत्कृष्ट खेळ केला. असे ट्विट विरेंद्र सेहवागने केले आहे.

एवढेच नव्हे तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील नामिबिया संघाचे कौतुक केले आहे. "नामिबिया संघाने क्रिकेट विश्वाला आज सांगितले की... नाव लक्षात ठेवा" असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिनच्या या ट्विटला नामिबिया संघाच्या कर्णधाराने प्रतिक्रिया दिली आहे. नामिबियाचा कर्णधार गेराड इरॉसमस याने सचिनच्या ट्विटला रिट्विट करत "नाम याद रखना" असे ट्विट केले आहे.

आशिया चषकात श्रीलंकेने उत्तम कामगिरी करत, चषकावर नाव कोरले आहे. नामिबियाविरोधात पराभव झाल्याने श्रीलंकेला धक्का बसला आहे. आता श्रीलंकेला सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर सर्व सामन्यांमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT