Siddharth Mohite Dainik Gomantak
क्रीडा

World Record: 'या' भारतीय क्रिकेटरने 4325 मिनिटे क्रीजवर थांबून केला रेकॉर्ड !

मुंबईचा युवा फलंदाज सिद्धार्थ मोहितेने (Siddharth Mohite) नेटमध्ये 72 तास पाच मिनिटे ( 4325 minutes) फलंदाजी करत विश्वविक्रम केला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईचा (Mumbai) युवा फलंदाज सिद्धार्थ मोहितेने (Siddharth Mohite) नेटमध्ये 72 तास पाच मिनिटे ( 4325 minutes) फलंदाजी करत विश्वविक्रम केला आहे. तो सर्वाधिक वेळ क्रीजवर राहणारा खेळाडू ठरला आहे. मात्र, तो या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ओळख होण्याची वाट पाहत आहे. त्यासाठी त्याने अर्जही केला आहे. सिध्दार्थने देशबांधव विराग मानेचा सात वर्षे जुना विक्रम मोडला आहे. (Mumbai's Siddharth Mohite Has Set A World Record By Batting In The Net For 72 Hours And Five Minutes)

दरम्यान, विराग मानेने सलग 50 तास फलंदाजी केली होती. 19 वर्षीय मोहिते गेल्या आठवड्याच्या शेवटी 72 तास पाच मिनिटे क्रीजवर राहिला. याबाबत सिध्दार्थ सांगितले की, “मला हा विक्रम खूप दिवसांपासून करायचा होता. अखेर मी माझ्या प्रयत्नात यशस्वी झालो, याचा मला आनंद आहे. असे करुन मी जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला की, मी देखील काहीतरी करु शकतो." प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी मोहितला 72 तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करण्यास मदत केली आहे.

दुसरीकडे, सर्वजण मोहितेला असे करण्यास मनाई करत होते, परंतु त्याने जिद्दीने हे यश संपादन केले. मोहिते पुढे म्हणाला, “सर्वजण मला हे करण्यापासून रोखत होते. अशा परिस्थीतीत मी ज्वाला सरांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी मी तुझ्या पाठीशी असल्याचे म्हटले. तसेच मला आवश्यक असणारी पूर्ण मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले."

तसेच, नियमानुसार मोहितेने दर एक तासानंतर पाच मिनिटे विश्रांती देण्यात आली. त्याच्या फलंदाजीचीही नोंद झाली आहे. ते रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी पाठवण्यात आली आहेत. यावेळी मोहिते म्हणाला, 'कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं.'

प्रशिक्षक ज्वाला सिंग म्हणाले, “मोहिते कोरोना महामारीपूर्वी एमसीसी प्रो-40 लीगचे सदस्य होता. त्याच्या आईने माझ्याशी त्यावेळी संपर्क साधला होता. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा याबाबत माझ्याशी संपर्क साधला. मात्र मी याबद्दल तयार नव्हतो. परंतु मला माहित होते की, कोरोनामुळे अनेक खेळाडूंची वर्षे वाया गेली आहेत. म्हणून मी त्याच्यासोबत काहीतरी वेगळं करायला तयार झालो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT