Shubha Satheesh and Jemimah Rodrigues BCCI
क्रीडा

INDW vs ENGW, Test: पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजी चमकली; चौघींची फिफ्टी,तर संघाच्या 400 धावा पार

India Women vs England Women, Mumbai Test: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील कसोटी सामन्याला गुरुवारपासून (14 डिसेंबर) सुरुवात झाली आहे.

Pranali Kodre

India Women vs England Women, Mumbai Test, 1st day result:

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात चार दिवसीय कसोटी सामन्याला गुरुवारपासून (14 डिसेंबर) सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.

पहिल्या दिवसाखेर भारताने 94 षटकात 7 बाद 410 धावा केल्या. भारताकडून शुभा सतीश, जेमिमा रोड्रिग्स, यास्तिका भाटीया आणि दिप्ती शर्मा यांनी अर्धशतके केली.

या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली.

मात्र या दोघींना मोठी खेळी करता आली नाही. सहाव्या षटकात पहिल्या चेंडूवर स्मृतीला लॉरेल बेलने 17 धावांवर बाद केले. शफली वर्माला 9 व्या षटकात केट क्रॉसने 19 धावांवर बाद केले.

मात्र, त्यानंतर शुभा सतीश आणि जेमिमा रोड्रिग्स यांनी भारताचा डाव सावरताना शतकी भागीदारी केली. त्यांनी शतकी भागीदारी करताना अर्धशतकेही केली.

शुभाने 76 चेंडूत 13 चौकारांसह 69 धावा केल्या. त्याचबरोबर जेमिमाने 99 चेंडूत 11 चौकारांसह 68 धावा केल्या. शुभाला 33 व्या षटकात सोफी इक्लेस्टोनने बाद केले, तर 38 व्या षटकात जेमिमाला लॉरेन बेलने त्रिफळाचीत केले.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटीया यांच्यातही 116 धावांची भागीदारी केली. मात्र, हरमनप्रीतचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. तिला 49 धावांवर डॅनिएल वॅटने धावबाद केले. तिच्यानंतर लगेचच 67 व्या षटकात अर्धशतक केलेल्या यास्तिका भाटीयाला चार्ली डीनने बाद केले. डीनने 88 चेंडूत 66 धावांची खेळी केली.

त्यानंतरही स्नेह राणा आणि दिप्ती शर्माने डाव पुढे नेला. त्यांनी 92 धावांची भागीदारी केली. पण पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यास काही वेळच बाकी असताना स्नेह राणाला 30 धावांवर नतालिया सायव्हर-ब्रंटने त्रिफळाचीत केले. पहिला दिवस संपला, तेव्हा दिप्ती शर्मा 60 धावांवर नाबाद राहिली. तसेच पुजा वस्त्राकर 4 धावांवर नाबाद राहिली.

इंग्लंडकडून लॉरेन बेलने 2 विकेट्स घेतल्या, तर केट क्रॉस, नतालिया सायव्हर-ब्रंट, शारलॉट डीन आणि सोफी इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: 'बॅगेत तिरंगा होता म्हणून अटक केली'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 2013 साली जम्मू काश्मीरमध्ये घडलेला प्रसंग

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

India Test Team: चाहत्यांचा भ्रम ठरला फोल, 'रोहित-विराट' नसतानाही टीम इंडिया सुस्साट…युवा ब्रिगेड जबरदस्त फाॅर्ममध्ये

Women Health: महिलांनो, तुमच्या पोटाचे विकार हलक्यात घेऊ नका! असू शकते 'या' गंभीर आजाराची सुरुवात

Online Fraud: बक्कळ पैसा मिळेल... तो आमिषाला भूलला अन् 2.5 कोटी गमावून बसला; महाराष्ट्रातून एकाला अटक

SCROLL FOR NEXT