Mumbai Indians | WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: तयारी सुरू! मुंबई इंडियन्सची जर्सी लाँच, खेळाडूंची सरावालाही सुरुवात; पाहा फोटो

Mumbai Indians: वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सने जर्सी लाँच केली असून त्यांच्या संघाने सरावालाही सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगाम 4 मार्चपासून मुंबईत सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच 5 संघातील खेळाडूंनी भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघही असून त्यांच्या संघाच्या सरावाला सुरुवातही झाली आहे.

Mumbai Indians WPL

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर संघाच्या सरावादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, फ्रँचायझीकडून सर्वच खेळाडूंचे खास स्वागतही करण्यात आले होते. या व्हिडिओ आणि फोटोंमधून खेळाडूंचा पहिला डब्ल्यूपीएल हंगाम खेळण्यासाठीचा उत्साह दिसून येत आहे.

Mumbai Indians WPL Jersey

याबरोबरच मुंबई इंडियन्सने त्यांच्या महिला संघाची जर्सीही लाँच केली आहे. ही जर्सी निळ्या रंगाची असून दोन्ही बाजूंना लाल रंग आहे. तसेच सोनेरी रंगाच्याही छटा या जर्सीमध्ये दिसत आहेत.

Jhulan Goswami | Charlotte Edwards

मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये झुलन गोस्वामी, शारलोट एडवर्ड यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. झुलन या संघाची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तसेच या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद शारलोट एडवर्डकडे आहे. त्याचबरोबर देविका पळशिकर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून, तर तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघाची मॅनजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

Mumbai Indians WPL Auction 2023

मुंबई इंडियन्स संघाने मुंबईत 13 फेब्रुवारीला पार पडलेल्या लिलावातून 17 खेळाडूंना खरेदी केले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला 1.80 कोटी रुपये खर्च करून खरेदी केले आहे. तसेच तिच्याकडे या संघाचे कर्णधारपदही हरमनप्रीतकडेच सोपवण्यात आले आहे.

Mumbai Indians WPL

दरम्यान, मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नतालिया स्किव्हरसाठी सर्वाधिक 3.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच त्यांनी नतालिया आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त पाच खेळाडूंसाठी 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजली आहे. यामध्ये पुजा वस्त्राकार (1.90 कोटी), यास्तिका भाटिया (1.50 कोटी) आणि एमेलिया केर (1 कोटी) यांचा समावेश आहे.

डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे. याच सामन्याने डब्ल्यूपीएलची सुरुवात होणार आहे.

Mumbai Indians WPL

डब्ल्यूपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्स संघ -

नतालिया स्किव्हर (3.20 कोटी), पुजा वस्त्राकार (1.90 कोटी), हरमनप्रीत कौर (1.80 कोटी), यास्तिका भाटिया (1.50 कोटी),एमेलिया केर (1 कोटी), अमरज्योत कौर (50 लाख), हेली मॅथ्यूज (40 लाख), क्लो ट्रायॉन (30 लाख),हिदर ग्रॅहम (30 लाख), इसाबेल वाँग (30 लाख), प्रियंका बाला (20 लाख), धारा गुज्जर (10 लाख),हुमेरा काझी (10 लाख),जिंतीमनी कालिता (10 लाख), निलम बिश्त (10 लाख),सायका इशक (10 लाख), सोनम यादव (10 लाख).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT