Gautam Gambhir | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Gambhir-Rohit Video: विराटला नडणाऱ्या गंभीरची रोहितबरोबर दिसली घट्ट मैत्री, चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि गौतम गंभीरने एकमेकांची भेट घेतली होती.

Pranali Kodre

Rohit Sharma Meet Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (16 मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. हा आयपीएल 2023 हंगामातील 63 वा सामना आहे.

दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यातील मैत्री दिसली आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ लखनऊने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसले की सामन्यापूर्वी रोहित आणि गंभीर एकमेकांना मैदानात भेटले, यावेळी या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर हे दोघेही गप्पा मारताना दिसले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यानंतर गंभीर आणि बेंगलोरचा फलंदाज विराट कोहलीमध्ये मोठे भांडण झाले होते. त्यानंतर या दोघांवरही बीसीसीआयने कारवाई करताना सामनाशुल्काच्या 100 टक्के दंडही लावला होता.

त्यामुळे रोहित आणि गंभीरच्या भेटीच्या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी विराटचाही संदर्भ जोडत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

प्लेऑफसाठी महत्त्वाचा सामना

दरम्यान, मुंबई आणि लखनऊ संघात मंगळवारी होत असलेला सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. हे दोन्ही संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहे. याच शर्यतीतील आपले स्थान आणखी भक्कम करण्यासाठी दोन्ही संघांचा विजयासाठी प्रयत्न असणार आहे. कारण या सामन्यात पराभव झाल्यास पुढील मार्ग कठीण होणार आहेत.

मुंबईने जिंकला टॉस

या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, आकाश मधवाल

  • लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मंकड, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT