Rohit Sharma and Piyush Chawla Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: पीयुष चावलाच्या चूकीवर भडकला रोहित शर्मा, मैदानावरच व्यक्त केला राग

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पीयुष चावलावर भडकल्याचेही दिसले होते.

Pranali Kodre

Rohit Sharma Angry on Piyush Chawla: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात 35 वा सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 55 धावांनी मोठा विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फिरकीपटू पीयुष चावलावर भडकल्याचेही दिसले होते.

या सामन्यात चावलाने मुंबईकडून खरंतर चांगली गोलंदाजी करताना मधल्या षटकांमध्ये 2 विकेट्सही घेतल्या होत्या. मात्र, 17 व्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्याकडून चूक झाली.

झाले असे की 17 व्या षटकात रिली मॅरिडिथ गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या एका चेंडूवर अभिनव मनोहरने शॉट खेळला. पण तो चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेला पीयुष चावला अडवेल, असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र, त्याच्याकडून चेंडूचा अंदाज घेण्यात चूक झाली आणि त्याच्या हातून चेंडू निसटून सीमापार करून गेला. त्यामुळे गुजरातला चौकार मिळाला.

पण, पीयुष चावलाकडून झालेली ही चूक पाहून रोहितचा राग अनावर झाला. त्याने त्याची नाराजी स्पष्ट व्यक्त केली आणि तो चावलाला रागात काहीतरी म्हणाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गुजरातने जिंकला सामना

दरम्यान या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 207 धावा केल्या होत्या. गुजरातकडून शुभमन गिलने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच डेव्हिड मिलर (46) आणि अभिनव मनोहर (42) यांनीही चांगली खेळी केली. याशिवाय अखेरीत राहुल तेवतियानेही आक्रमक फलंदाजी करताना 3 षटाकारांसह 5 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावाच करता आल्या. मुंबईकडून नेहल वढेराने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. याशिवाय कॅमेरॉन ग्रीनने 33 धावा केल्या. पण अन्य कोणाला फार काही करता आले नाही.

गुजरातच्या गोलंदाजांनीही शानदार कामगिरी बजावली. गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच राशीद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याने 1 विकेट घेतली. तसेच मोहम्मद शमीला विकेट मिळाली नसली, तरी त्याने चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 18 धावा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT