Gautam Gambhir on MS Dhoni: साल 2011 भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अविस्मरणीय आहे. याचवर्षी 2 एप्रिलला भारतीय संघाने श्रीलंकेला वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते आणि तब्बल 28 वर्षांनी विश्वविजेत्याचा मान मिळवला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी केलेल्या खेळी महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या.
दरम्यान, या अंतिम सामन्याबद्दल आता गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अंतिम सामन्यात गौतम गंभीर आणि धोनी यांनी शतकी भागीदारी केली होती. पण गंभीर 97 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला होता. पण, आता धोनीने गंभीरला त्यांच्या भागीदारीदरम्यान शतक करण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे त्याने मान्य केले आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडेदरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, 'एमएस धोनी खूप पाठिंबा देत होता. कारण त्याला वाटत होते की मी शतक करावे.'
'धोनीला त्यावेळी नेहमीच वाटत होते की मी शतकी खेळी करावी. त्याने मला भागीदारीदरम्यान सांगितलेही होते की तू शकत कर, तुझा वेळ घे आणि घाई करू नकोस. जर गरज लागली, तर मी नंतर आक्रमक खेळेल.'
मात्र, गंभीरचे शतक केवळ 3 धावांनी हुकले. या सामन्यात श्रीलंकेने भारताला 275 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने वरच्या फळीतील विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर धोनी आणि गंभीरने 109 धावांची भागीदारी करून भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला होता.
(MS Dhoni wanted me to get a hundred, Gautam Gambhir recalls 2011 World Cup)
मात्र, भारतीय संघ विजयाचा जवळ आल्यानंतर गंभीर बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगने धोनीला चांगली साथ दिली. अखेर धोनीने षटकार मारून भारताला विश्वविजय मिळवून दिला. त्यावेळी धोनी 91 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
दरम्यान, धोनीला देण्यात आलेल्या सामनावीराच्या पुरस्काराबद्दल आजही चर्चा होते. अनेकांच्या मते गंभीरनेही महत्त्वपूर्ण खेळी केली असल्याने हा पुरस्कार त्याला द्यायला हवा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.