MS Dhoni's car Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Viral Video: कॅप्टनकुलची रोल्स रॉयसनंतर Pontiac Trans मधून रांचीच्या रस्त्यावर राईड, पाहा व्हिडिओ

महेंद्रसिंग धोनीचा Pontiac Trans कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

MS Dhoni Viral Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वांचाच आवडता खेळीडू आहे. त्याची एख झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स खुप उत्सुक असतात. अशीच त्याची एक झलक रांचीमध्ये युजरने टिपली आहे. या व्हिडिओमध्ये 1973 Pontiac Trans Am SD-455  कार चालवतांना दिसत आहे.

कॅप्टनकुलला कार आणि बाईक्सची असणारी आवड सर्वश्रुत आहे. तो अनेकदा त्याची बाईक किंवा कार झारखंडची राजधानी आणि धोनीची जन्मभूमी असलेल्या रांची शहरात चालवताना दिसतो.

अलिकडेच त्याचा रांचीच्या रस्त्यांवर Pontiac Trans Am SD-455  कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काळ्या रंगाची सँडो घातली आहे. त्याच्या शेजारी कोणीतरी बसल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, धोनीकडे अनेक विंटेज कार ते नव्या मॉडेलपर्यंतच्या कार आहेत. तसेच त्याच्याकडे अनेक बाईक्सही आहेत. रिपोर्ट्सनुसार धोनीकडे 15 हून अधिक कार आणि 70 च्या आसपास बाईक्स आहेत.

दरम्यान, अलिकडेच विमानात झोपलेल्या धोनीचा व्हिडिओ एअर होस्टेसने व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये धोनी झोपलेला दिसत होता तर त्यांची पत्नी साक्षी शेजारच्या सीटवर बसून मोबाईल वापरताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी व्हिडिओवर चांगल्या कमेंट दिल्या तर काही नेटकऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.

  • भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख

कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

  • IPL 2023 धोनीने चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केले

अलिकडेच झालेल्या IPL 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेदरम्यान धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. या स्पर्धेनंतर मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चेन्नई सुपर किंगचे CEO काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT