MS Dhoni Birthday Celebration Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Birthday: धोनीचं आगळं-वेगळं सेलिब्रेशन, बर्थडे पार्टीची गँग खूपच स्पेशल; व्हिडिओ व्हायरल

MS Dhoni Birthday Celebration: एमएस धोनीने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Shares Video of His Birthday Celebration with Dogs: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने शुक्रवारी (7 जुलै) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. तो या दिवशी रांचीमध्ये त्याच्या घरीच होता. दरम्यान त्याने त्याने त्याचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे धोनीनेच त्याच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडिओही शेअर केला आहे.

कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने त्याच्या रांचीतील घरी त्याच्या लाडक्या कुत्र्यांसह त्याचा वाढदिवस साजरा केला. धोनीने शेअर केलेल्या या सेलिब्रेशनच्या व्हिडिओला अर्ध्यातासात 21 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी केक कापत असताना त्याचे पाळीव कुत्रे त्याच्या टेबलच्या आसपास आहेत. तसेच धोनीने केक कापल्यानतंर तो केक त्याच्या कुत्र्यांनाही भरवला आहे. या व्हिडिओला त्याने ब्युटीफुल हे गाणेही बॅकग्राऊंडला लावले आहे.

त्याचबरोबर धोनीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत. तसेच त्याने लिहिले की 'मी माझ्या वाढदिवसाला काय केले, याची ही एक झलक'.

धोनीसाठी त्याचे पाळीव कुत्रे फार जवळचे आहेत. तो जेव्हाही घरी असतो, तेव्हा तो आवर्जून त्याच्या कुत्र्यांना वेळ देतो. त्याने अनेकदा त्याच्या कुत्र्यांबरोबर खेळतानाचे व्हिडिओही व्हायरल होत असतात.

धोनीकडे जवळपास 4-5 पाळीव कुत्रे आहेत. याशिवाय त्याच्याकडे एक घोडाही आहे. धोनीने शेती उद्योगालाही सुरुवात केली असल्याने अनेकदा तो त्याच्या शेतातही रमलेला दिसतो.

दरम्यान, धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. फार क्वचितच तो सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्याने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या पोस्टआधी अखेरची पोस्ट ५ महिन्यांपूर्वी केली होती.

चाहत्यांचाही दिवस बनवला खास

दरम्यान, धोनीच्या वाढदिवसाच्या दिवसाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. काही चाहत्यांनी शुक्रवारी रांचीमध्ये धोनीच्या घराबाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. याचदरम्यानचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी त्याच्या घराच्या टेरेसवर काही लोकांसह उभा आहे. तेथून त्याने त्याच्या घराबाहेर असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हालवला. त्यामुळे त्याने त्याचा वाढदिवस चाहत्यांसाठीही खास बनवला.

धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने मे महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पण धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता.

त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली. सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.

लोकप्रिय क्रिकेटपटू

धोनी हा केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली, तरी त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही.

धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT