MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: धोनी पुन्हा मैदानात दिसणार! CSK ने 17 व्या हंगामासाठी कॅप्टनकूलला केलं संघात कायम

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 स्पर्धेसाठी कर्णधार एमएस धोनीला संघात कायम केले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni retained by Chennai Super Kings ahead of IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. हा आयपीएलचा १७ वा हंगाम असणार आहे. या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्व संघांनी आपल्या संघातून मुक्त केलेल्या आणि संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींना 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्सनेही आपल्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

दरम्यान, चेन्नईने मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार एमएस धोनीचे नाव नसल्याने तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याचे जवळपास पक्के मानले जात आहे. याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही तो खेळेल, असे अंदाज व्यक्त केल आहेत.

इतकेच नाही, तर चेन्नईने संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करताना धोनीच्या नावापुढे कर्णधार हे पदही कायम ठेवले आहे. त्याचमुळे तो पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करतानाही दिसू शकतो.

धोनीसाठी आयपीएल 2023 स्पर्धा अखेरची असेल, असे म्हटले जात होते. त्यावेळी त्याला गुडघ्याची दुखापतही होती. हा हंगाम चेन्नईने जिंकल्यानंतर धोनीने गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करून घेतली होती. त्याचमुळे आयपीएल 2024 मध्ये त्याच्या खेळण्यावर मोठे प्रश्नचिन्ह होते.

पण, आता चेन्नईने संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचे नाव असल्याने तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

चेन्नईने आयपीएल 2024 लिलावाआधी संघात कायम केलेले आणि मुक्त केलेले खेळाडू-

  • कायम केलेले खेळाडू - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, दीपक चाहर, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगारगेकर, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल.

  • मुक्त केलेले खेळाडू - बेन स्टोक्स, ड्वेन प्रीटोरियस, अंबाती रायुडू, सिसांडा मगला, काईल जेमिसन, भगत वर्मा, सुभ्रांशू सेनापती, आकाश सिंग, अंबाती रायुडू (निवृत्त झाल्याने तो देखील या संघाचा भाग नसेल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT