CSK चा 'हा' दिग्गज खेळाडू सुरु करणार नवी इनिंग, राजकारणात आजमावणार नशीब; लढवणार निवडणूक!

Amabti Rayudu YSRCP: टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आता सीएसकेचा माजी स्टार खेळाडू नवी इनिंग सुरु करणार आहे.
Amabti Rayudu
Amabti RayuduDainik Gomantak
Published on
Updated on

Amabti Rayudu YSRCP: टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आता सीएसकेचा माजी स्टार खेळाडू नवी इनिंग सुरु करणार आहे. राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला आहे.

टीम इंडियाचा हा माजी क्रिकेटपटू लोकसभा निवडणूक लढवणार आहे. हा खेळाडू आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. विशेष म्हणजे, या सामन्यासह त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

हा अनुभवी खेळाडू नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अंबाती रायडू (Amabti Rayudu) लवकरच आंध्र प्रदेशमधून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू शकतो. रायुडू वायएसआरसीपीमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. रायुडू हा गुंटूरचा आहे.

त्याने गेल्या आठवड्यात दोनदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. अहवालानुसार, सीएम जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी निवडणुकीच्या हंगामात रायडूला उभे करण्याचे मन बनवले आहे.

Amabti Rayudu
IPL 2023: रात्री 3.30 वाजता... एकिकडे CSK टीम जल्लोष करत होती, तर दुसरीकडे धोनी मात्र चाहत्यांना...

आयपीएल 2023 च्या फायनलने धुमाकूळ घातला

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूच्या IPL कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. अंतिम सामन्यात अंबाती रायडूच्या बॅटने स्फोटक खेळी पाहायला मिळाली होती.

त्याने 8 चेंडूत 237.50 च्या स्ट्राईक रेटने 19 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यापूर्वी रायुडूने ट्विट करुन निवृत्ती जाहीर केली.

Amabti Rayudu
IPL 2023: चॅम्पियन CSK ची हॉटेलमध्ये नाचत एन्ट्री अन् पाथिरानाच्या हातात ट्रॉफी, पाहा Video

अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द

अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायुडू (Amabti Rayudu) 2018 पासून CSK कडून खेळत आहे.

रायडूने आयपीएलमध्ये 204 सामन्यांत 28.23 च्या सरासरीने 4348 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. त्याचवेळी, अंबाती रायडू हा 6 वेळा आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com