MS Dhoni DainikGomantak
क्रीडा

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

MS Dhoni Jersey Change Video: आगामी आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी धोनीने स्वतःच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो आपली ऐतिहासिक 7 क्रमांकाची जर्सी सोडून देताना दिसत आहे.

Manish Jadhav

MS Dhoni Jersey Change Video: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची 'नंबर 7' ची जर्सी हे समीकरण गेल्या दोन दशकांपासून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. मात्र, आगामी आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी धोनीने स्वतःच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो आपली ऐतिहासिक 7 क्रमांकाची जर्सी सोडून देताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच वादळ निर्माण केले असून "थाला" खरोखरच आपला लकी नंबर बदलणार का, या प्रश्नाने चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. या व्हिडिओनुसार धोनी आगामी हंगामात 7 ऐवजी '8' नंबरची जर्सी घालून मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

क्रिकेट जगतात काही खेळाडूंची ओळख त्यांच्या जर्सी नंबरवरुनच निर्माण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'नंबर 10' ज्याप्रमाणे अजरामर झाला, त्याचप्रमाणे धोनीने 'नंबर 7' ला एक वेगळीच उंची मिळवून दिली. 2007 चा टी-20 विश्वचषक असो, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक किंवा 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने मिळवलेल्या प्रत्येक विजयावेळी धोनीच्या पाठीवर हाच 7 आकडा चमकत होता. खुद्द धोनीने एकदा 7 क्रमांकामागचे गुपित सांगताना म्हटले होते की, "माझा जन्म 7 जुलैला झाला, जो वर्षाचा सातवा महिना आहे. तसेच माझ्या जन्माचे वर्ष 1981 मधील 8 वजा 1 केल्यास 7 हाच आकडा येतो." इतके भावनिक नाते असतानाही धोनीने जर्सी बदलण्याचा निर्णय घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले.

धोनीच्या या निर्णयामुळे चाहते चिंतेत असले तरी, क्रीडा विश्वातील जाणकारांच्या मते हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या जाहिरात कॅम्पेनचा (Commercial Campaign) भाग असू शकतो. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे 'टीझर' प्रसिद्ध करुन ब्रँड प्रमोशन करण्याची पद्धत जुनी आहे. जसे ख्रिस गेलने आपल्या 333 धावांच्या सर्वोच्च धावसंख्येची आठवण म्हणून '333' नंबरची जर्सी घातली होती, तसाच काहीसा प्रयोग येथे असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, बीसीसीआयने 2023 मध्येच धोनीच्या 'नंबर 7' जर्सीला निवृत्त (Retire) करुन त्याला सन्मान दिला. सचिननंतर हा मान मिळवणारा धोनी दुसराच भारतीय खेळाडू आहे. याचा अर्थ भविष्यात कोणताही भारतीय खेळाडू हा नंबर वापरु शकणार नाही.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी त्याचे योगदान आजही तितकेच मोलाचे आहे. आयपीएल (IPL) 2026 मध्ये तो पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत खेळताना दिसेल, पण पाठीवर 7 की 8 नंबर असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जर धोनीने खरोखरच 8 नंबर स्वीकारला, तर त्यामागे काय लॉजिक असेल, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या तरी या व्हिडिओमुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांसाठी जर्सीवरील 7 आकडा ही केवळ संख्या नसून ती एक भावना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

SCROLL FOR NEXT