MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Viral Video: विमानात झोपलेल्या धोनीचा व्हिडिओ एअर होस्टेसने केला व्हायरल; नेटकरी म्हणाले, तुला काही..

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये तो फ्लाइटमध्ये झोपलेला दिसत आहे.

Puja Bonkile

MS Dhoni Viral Video: महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नसतो. तो अगदी साधेपणाचे जीवणमान जगतो. त्यामुळे त्याचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर आला की तो खुप व्हायरल होतो. अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये झोपलेला दिसत आहे.

हा व्हिडिओ एका एअर होस्टेसने बनवला असून सोशल मिडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी झोपलेला दिसत आहे तर त्यांची पत्नी साक्षी शेजारच्या सीटवर बसून मोबाईल वापरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी व्हिडिओवर चांगल्या कमेंट दिल्या तर काही नेटकऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी धोनी आणि त्याच्या पत्नीची प्रॅवेसी ब्रेक केली म्हणत एअर होस्टेसवर टीका केली आहे. तर एका यूजरने लिहिले की, "हा एका व्यक्तीच्या प्रॅव्हसीमध्ये हस्तक्षेप केला आहे."

अलिकडेच झालेल्या IPL 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेदरम्यान धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. या स्पर्धेनंतर मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चेन्नई सुपर किंगचे CEO काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT