MS Dhoni - Dwayne Bravo X
क्रीडा

MS Dhoni: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगला धोनी-ब्रावोच्या दांडियांनी वेधलं लक्ष, Video व्हायरल

MS Dhoni-Dwayne Bravo playing Dandiya: सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची जोरदार चर्चा सुरू असून या कार्यक्रमात एमएस धोनी ड्वेन ब्रावोबरोबर दांडिया खेळताना दिसला.

Pranali Kodre

MS Dhoni-Dwayne Bravo playing Dandiya at Pre-Wedding of Anant Ambani

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे राधिका मर्चंटसोबत लग्न ठरले असून त्याच्या प्री-वेडिंगची सध्या जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये होत आहेत.

या प्री-वेडिंगसाठी जगभरातून विविध क्षेत्रात मोठ-मोठे मान्यवर जामनगरमध्ये उपस्थित आहेत. अगदी बिझनेसमन बिल गेट्स, मार्क झुकेरबर्गपासून ते एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, सॅम करन अशा क्रिकेटपटूंपर्यंत अनेक सेलिब्रेटींची मांदीयाळी या प्री-वेडिंगमध्ये पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात दांडिया देखील ठेवल्या होत्या. या कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटपटू धोनीही पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाला होता. त्याच्यासह त्याची पत्नी साक्षी देखील होती.

या कार्यक्रमात धोनी दांडिया खेळतानाही दिसला. तो वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रावो आणि आकाश अंबानी यांच्यासह दांडिया खेळतानाही दिसला. या क्षणांचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

अनेक क्रिकेटपटूंची हजेरी

दरम्यान, तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी केवळ धोनी, ब्रावोच नाही, तर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सॅम करन, ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिड, राशिद खान, झहिर खान असे अनेक क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली आहे. कायरन पोलार्ड तर पाकिस्तान सुपर लीगमधील सामने सोडून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आहे.

दरम्यान, आता 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी लवकरच सर्व संघांची तयारीला सुरुवात होणार आहे. प्री-वेडिंगसाठी उपलब्ध असलेले अनेक क्रिकेटपटू आता या आयपीएल हंगामातही खेळताना दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT