Arshdeep Singh Ravi Bishnoi Kuldeep Yadav Hardik Pandya Axar Patel X
क्रीडा

Year Ender: अर्शदीप अव्वल! 2023 मध्ये भारतासाठी T20I मध्ये कोणत्या 5 बॉलर्सने घेतल्या सर्वाधिक विकेट्स, पाहा लिस्ट

Most T20I Wickets for India: आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2023 वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Most T20I Wickets for India in 2023:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने टी20 आणि वनडे मालिका खेळून झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका ही २०२३ वर्षातील भारतीय संघाची अखेरची टी२० मालिका होती. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये २०२३ वर्षात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

यावर्षात भारतीय संघाने 23 टी20 सामने खेळले, ज्यात 15 विजय आणि 7 पराभव स्विकारले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

1. आर्शदीप सिंग

भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळले. त्याने 2023 मध्ये 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 24.46 च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या. 20 धावांत 23 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ही कामगिरी त्याने श्रीलंकेविरुद्ध राजकोटमध्ये खेळताना केली होती.

2. रवी बिश्नोई

भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने 2023 मध्ये 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 17.61 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या. त्याने यावर्षी टी20 क्रमवारी गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकही पटकावला होता. त्याची 24 धावांत 3 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ही कामगिरी त्याने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध केली होती.

3. कुलदीप यादव

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 2023 वर्षात भारताकडून 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. यामध्ये त्याने 13.14 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. त्याने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 धावांत 5 विकेट्स घेतल्या, ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

4. हार्दिक पंड्या

अष्टपैलू हार्दिक पंड्या 2023 मध्ये भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2023 मध्ये 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 23.18 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या. त्याने न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादमध्ये टी20 सामन्यात 16 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या, ही त्याची यावर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

5. अक्षर पटेल

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने 2023 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 13 सामने खेळले असून 26.45 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. 16 धावांत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ही कामगिरी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रायपूरमध्ये खेळताना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT