Most sixes in T20 cricket 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Most Sixes In 2026: टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीला विशेष महत्त्व आहे. काही फलंदाज मैदानावर उतरले की चौकारांपेक्षा षटकारांचा पाऊस पाडताना दिसतात.

Sameer Amunekar

Top 10 most sixes in T20 cricket 2026: टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीला विशेष महत्त्व आहे. काही फलंदाज मैदानावर उतरले की चौकारांपेक्षा षटकारांचा पाऊस पाडताना दिसतात. २०२६ हे वर्षही अशाच काही धडाकेबाज फलंदाजांसाठी खास ठरले आहे.

भारताचा अभिषेक शर्मा, न्यूझीलंडचा फिन ॲलन, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन, दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकेल्टन आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श यांनी यंदा टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर षटकारांची आतषबाजी केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी या यादीत चर्चेत असलेला युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आता टॉप-५च्या बाहेर गेला आहे.

अभिषेक शर्मा

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ४४ सामन्यांत तब्बल १०४ षटकार ठोकले आहेत. म्हणजेच अभिषेकने शंभर षटकारांचा टप्पाही पार केला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण होते.

अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अभिषेकने आपली ताकद दाखवली. त्याने ६१ धावांची आक्रमक खेळी करताना तब्बल ७ षटकार लगावले. या कामगिरीनंतर त्याने सर्वाधिक षटकारांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले.

फिन ॲलनची अभिषेकला कडवी टक्कर

या यादीत न्यूझीलंडचा फिन ॲलन दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची ओळख आक्रमक फलंदाज म्हणून आहे. ॲलनने ५३ सामन्यांत १०१ षटकारांची आतषबाजी केली आहे. त्यामुळे अभिषेक आणि ॲलन यांच्यातील अंतर सध्या फारसे मोठे नाही.

विशेष म्हणजे ॲलनने अभिषेकपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १,४९६ धावाही जमा आहेत. त्यामुळे वर्षाच्या पुढील सामन्यांमध्ये ही क्रमवारी पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

निकोलस पूरन शंभरच्या उंबरठ्यावर

वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मैदानाच्या कोणत्याही भागात षटकार मारण्याची क्षमता असलेल्या पूरनने २०२६ मध्ये आतापर्यंत ४९ सामन्यांत ९९ षटकार ठोकले आहेत. त्यामुळे तो आता शंभर षटकारांच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

पूरनची टी-२० क्रिकेटमधील आक्रमक शैली पाहता लवकरच तो शंभरहून अधिक षटकारांच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या फलंदाजीचा संघाला टी-२० सामन्यांमध्ये मोठा फायदा होताना दिसतो.

रायन रिकेल्टनचीही दमदार कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकेल्टन २०२६ मध्ये आपल्या फलंदाजीने चर्चेत आला आहे. त्याने आतापर्यंत ४२ टी-२० सामन्यांत ९६ षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर नाबाद १२३ धावांची सर्वोत्तम खेळीही आहे.

आयपीएलसह विविध टी-२० स्पर्धांमध्ये रिकेल्टनने मोठे फटके मारण्याची क्षमता दाखवली आहे. त्यामुळे शंभर षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

मिचेल मार्श टॉप-५मध्ये

ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने तुलनेने कमी सामने खेळूनही मोठी कामगिरी केली आहे. २०२६ मध्ये मार्शने ३७ सामन्यांत ९५ षटकार लगावले आहेत. त्याच्या नावावर १,५४४ धावाही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT