Shakib-Mushfiqur Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: शाकीब-मुशफिकुर जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड!

ODI World Cup 2023 NZ vs BAN: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत.

Manish Jadhav

ODI World Cup 2023 NZ vs BAN: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्याची खास बाब म्हणजे या विश्वचषकात कर्णधार केन विल्यमसन पहिल्यांदाच आपल्या संघाची कमान सांभाळताना दिसत आहे.

यापूर्वी संघाचा कर्णधार टॉम लॅथम होता, विल्यमसन दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्याच क्षणी त्याचा निर्णय योग्य असल्याचे दिसून आले, जेव्हा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामीवीर लिटन दासला बाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

बांगलादेशने खूप प्रयत्न केले, पण एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. मात्र, बांगलादेशचा स्टार फलंदाज मुशफिकुर रहीम आणि कर्णधार शाकीब अल हसन यांनी मिळून वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.

मुशफिकुर रहीम आणि शकीब अल हसन यांनी सचिन-सेहवाग रेकॉर्ड मोडला

खरे तर, एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दोन फलंदाजांमधील भागीदारीमुळे जोडलेल्या धावांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनचे नाव प्रथम येते.

या दोघांनी मिळून 20 डावांमध्ये आपल्या संघासाठी 1220 धावा जोडल्या आहेत. यानंतर आतापर्यंत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग यायचे, पण आता हे दोघेही मागे पडले आहेत, त्यांच्या जागी शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम आले आहेत.

एकीकडे सचिन आणि सेहवागने 20 डावात मिळून 971 धावा केल्या होत्या, तर आता मुशफिकर रहीम आणि शकिब अल हसन यांनी मिळून 19 डावात 972 धावा केल्या आहेत.

एवढेच नाही तर एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 50 हून अधिक धावांच्या भागीदारीच्या बाबतीत हे दोघेही आता सचिन आणि सेहवागच्या बरोबरीने आले आहेत.

गिलख्रिस्ट आणि हेडन यांनी मिळून 12 वेळा ही कामगिरी केली आहे, तर सचिन आणि सेहवागने 8 वेळा 50 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. आता रहीम आणि शाकिबनेही ही कामगिरी आठ वेळा केली आहे.

मुशफिकर रहीमने अर्धशतकी खेळी खेळली

बांगलादेशच्या (Bangladesh) डावाबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडच्या शानदार गोलंदाजीसमोर संपूर्ण संघ 254 धावाच करु शकला. म्हणजेच आता न्यूझीलंडला सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी 246 धावांची गरज आहे.

बांगलादेशकडून रहीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 75 चेंडूत 66 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार शाकिबने 51 चेंडूत 40 धावा केल्या. अखेरीस महमुदल्लाहने 49 चेंडूत 41 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.

बांगलादेशने या वर्षात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केले आहे, तर संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाचे सध्या केवळ दोन गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT