Mayank Agarwal | IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: एकाही भारतीयाला मिळाले नाहीत 10 कोटी; 'हे' ठरले भारताचे सर्वात महागडे क्रिकेटर्स

आयपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडे भारतीय क्रिकेटर

Pranali Kodre

IPL Auction 2023: शुक्रवारी कोचीमध्ये पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 लिलावात महागड्या खेळाडूंच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले गेले. या लिलावात 80 खेळाडूंसाठी 10 फ्रँचायझींनी मिळून तब्बल 167 कोटी रुपये खर्च केले.

या लिलावामध्ये सॅम करन (18.50 कोटी), कॅमेरॉन ग्रीन (17.50 कोटी) आणि बेन स्टोक्स (16.25 कोटी) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले. हे तिघेही आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे तीन खेळाडूही ठरले आहेत.

(Most expensive Indian players in IPL Auction 2023)

दरम्यान, या लिलावासाठी सहभागी असलेल्या 405 खेळाडूंमध्ये 273 भारतीय खेळाडू आणि 132 परदेशी खेळाडू होते. त्यातील 51 भारतीय खेळाडूंना आणि 29 परदेशी खेळाडूंना या लिलावात बोली लागली. पण यातील एकाही भारतीय खेळाडूला 10 कोटींपेक्षा अधिक रक्कमेची बोली लागली नाही.

सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल आयपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. मयंकसाठी सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटी रुपये खर्च केले. तसेच या लिलावात केवळ 7 भारतीय खेळाडूंना कोटींमध्ये बोली लागली आहे. अन्य सर्व खेळाडू लाखांमध्ये विकले गेले आहेत.

आयपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडे भारतीय खेळाडू -

8.25 कोटी - मयंक अगरवाल (सनरायझर्स हैदराबाद)

6 कोटी - शिवम मावी (गुजरात टायटन्स)

5.50 कोटी - मुकेश कुमार (दिल्ली कॅपिटल्स)

2.60 कोटी - विवरांत शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)

2.40 कोटी - मनिष पांडे (दिल्ली कॅपिटल्स)

1.80 कोटी - मयंक डागर (सनरायझर्स हैदराबाद)

1.20 कोटी - केएस भरत (गुजरात टायटन्स)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT