Team India | Best Fielder Video BCCI
क्रीडा

Best Fielder Medal: टीम इंडियाचं फिल्डिंग मेडल नव्या अवतारात! T20I मालिकेत 'हा' खेळाडू ठरला सर्वोत्तम फिल्डर

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग मेडल देण्याचा सोहळा पार पडला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India T20I Series, Best Fielder Medal Video:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (14 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 106 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.

दरम्यान, या मालिकेनंतर शुक्रवारी सकाळी बीसीसीआयने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या मेडल प्रदान सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे अनेक चाहत्यांनाही आनंद झाला.

खरंतर भारतात झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड करायचे. या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला मेडल दिले जात होते.

या मेडल प्रदान सोहळ्याचे व्हिडिओ बीसीसीआयने प्रत्येकवेळी शेअर केले होते, जे खूप व्हायरलही झाले. तसेच या मेडल सोहळ्याला चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळाली होती.

आता या वर्ल्डकपनंतर हाच मेडल सोहळ्या नव्या अवतारात आल्याचे बीसीसीआयने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर मोहम्मद सिराजने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मेडल जिंकले.

व्हिडिओमध्ये दिसते की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर ड्रेसिंग रुममध्ये टी दिलीप यांनी सांगितले की वर्ल्डकपप्रमाणे प्रत्येक सामन्यानंतर मेडल देण्याऐवजी आता प्रत्येक मालिकेनंतर प्रभावी क्षेत्ररक्षकाला हे मेडल दिले जाणार आहे.

तसेच या मेडल मिळवण्यासाठी त्यांनी आधी तीन खेळाडूंना नामांकित केले. यामध्ये त्यांनी रिंकू सिंगच्या आणि यशस्वी जयस्वाल यांनी दाखवलेल्या क्षेत्ररक्षणातील चमकदार कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच त्यांनी वेगवान गोलंदाज सिराजचेही कौतुक केले.

नंतर सिराजची या मेडलाचा विजेता म्हणून घोषणा करताना त्यांनी नमुद केले की सिराजने वर्ल्डकप 2023 मध्येही चांगले क्षेत्ररक्षण केले होते, त्याची हीच कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यानही चालू राहिली. त्यामुळे त्याला हे मेडल मिळत आहे.

अखेरीस मेडल जिंकल्यानंतर भावूक झालेला सिराज म्हणाला, वर्ल्डकपपासून हे मेडल मिळण्याची वाट पाहात होतो, अखेर मला ते मिळाले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सिराजने क्षेत्ररक्षणात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्याने दुसऱ्या टी20 सामन्यात दोन झेल घेतले, तर तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने एक धावबादही केले.

या टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर भारताने तिसरा टी20 सामना जिंकल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT