Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

Mohammed Siraj: 'कोणतेच स्वप्न छोटे नसते, लहानपणी...' पहिला वर्ल्डकप सामना खेळण्यापूर्वी सिराज भावूक

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळण्यापूर्वी मोहम्मद सिराजने इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Mohammed Siraj emotional Social Media Post Ahead Of Match Againsta Australia in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघ वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सिराज कारकिर्दीत पहिल्यांदाच वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा त्याच्यासाठी खास असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना मांडल्या आहेत.

सिराजने सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत लिहिले की 'कोणतेही स्वप्न छोटे नसते. स्वप्न पूर्ण होतात. लहानपणी जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मी वर्ल्डकपमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते.'

'आता आम्ही आमची मोहिम सुरु करत आहोत, त्यामुळे मी तुमच्या सर्वांना विनंती करतो की प्रार्थना करा आणि पाठिंबा द्या. तुम्हाला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी कामगिरी करण्याचेच ध्येय आहे.'

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले असून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सिराज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याच्याकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने गेल्याच महिन्यात आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 7 षटकात 21 धावांमध्ये 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तसेच त्याची आत्तापर्यंतची कामगिरीही चांगली झाली आहे.

साल 2019 मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या सिराजने आत्तापर्यंत कारकिर्दीत 30 वनडे सामने खेळले आहेत. त्याने या 30 सामन्यांमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावांत 6 विकेट्स हीच त्याची सर्वोत्तम कामिगिरी आहे.

त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 2 वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने 2023 वर्षात 15 वनडे सामन्यांत 30 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT