World Cup मधील भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार 13 वा सामना; असा आहे 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया चेन्नईमध्ये तब्बल 36 वर्षांनंतर वर्ल्डकपचा सामना खेळणार आहेत.
India vs Australia
India vs AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia match, Head to Head record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (8 ऑक्टोबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सामना होणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकवर हा सामना रंगणार असून दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

या सामन्याने हे दोन्ही माजी विश्वविजेते संघ यंदाच्या वर्ल्डकपटी आपली मोहिम सुरू करणार आहेत. दोन्ही संघांनी गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली असल्याने आयसीसी क्रमवारीतही हे दोन्ही संघ अव्वल स्थानासाठी स्पर्धा करताना दिसले होते.

दरम्यान, वर्ल्डकपमधील सामन्यापूर्वी या दोन्ही संघांची आमने-सामने कशी आकडेवारी आहे, यावर एक नजर टाकू.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत 149 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 56 सामने भारताने जिंकले आहेत, तर 83 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्याचबरोबर 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

India vs Australia
World Cup 2023: एक, दोन नाही, तर तब्बल तीन शतके! द. आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर उभारत रचले विश्वविक्रम

त्याचबरोबर वर्ल्डकपमधील आमने-सामने आकडेवारी सांगायची झाल्यास आत्तापर्यंत 12 वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपमधील सामने झाले आहेत. यातील 8 वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे, तर भारताने 4 वेळा विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 2003 साली वर्ल्डकचा अंतिम सामनाही झालेला, तर 2015 वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ उपांत्य फेरीत आमने-सामने आले होते.

याशिवाय 2011 साली उपांत्यपूर्व फेरीत हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. यात 2003 च्या अंतिम सामन्यात आणि 2015 च्या उपांत्य सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते. पण 2011 साली भारताने विजय मिळवला होता.

दरम्यान, भारताने 2011 व्यतिरिक्त 1983, 1987 आणि 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला आहे. 1983, 1987 आणि 2003 सालच्या वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ प्रत्येकी दोनदा आमने-सामने होते.

यातील 1983 आणि 1987 मध्ये दोन्ही संघांना एक सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. 2003 साली मात्र दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. याव्यतिरिक्त 1992, 1996, 1999 या तीन वर्ल्डकपमध्ये भारताने पराभव स्विकारला होता.

India vs Australia
भारत अन् ऑस्ट्रेलिया World Cup 2023 मोहिमेची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक! पाहा संभावित 'प्लेइंग -11'

चेन्नईतील आमने-सामने आकडेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेपॉकवर आत्तापर्यंत 3 वनडे सामने झाले आहेत. यातील एक वर्ल्डकपचा सामना आहे. 1987 सालच्या वर्ल्डकपमध्ये या दोन संघात चेन्नईला सामना झाला होता. म्हणजेच यानंतर आता 36 वर्षांनंतर या दोन संघात चेन्नईमध्ये वर्ल्डकपचा सामना होणार आहे.

तथापि, 1987 साली झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 1 धावेने विजय मिळवला होता. याशिवाय 2017 आणि 2023 मध्ये या दोन संघात या मैदानावर वनडे सामने झाले आहेत. 2017 मध्ये भारताने 26 धावांनी विजय मिळवला होता, तर मार्च 2023 मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवलेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com