Imran Masood Discrimination Allegation Mohammed Siraj Selection Dainik Gomantak
क्रीडा

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Imran Masood Discrimination Allegation Mohammed Siraj Selection: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी न मिळाल्याने नवा वाद उफळला.

Manish Jadhav

Imran Masood Discrimination Allegation Mohammed Siraj Selection: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी न मिळाल्याने नवा वाद उफळला. सिराज चांगली कामगिरी करत असतानाही त्याला संघात का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी भेदभावाचा आरोप केला. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, चांगल्या कामगिरीनंतरही संधी मिळत नसेल तर भेदभाव दिसून येतो; कदाचित त्याचे नाव 'सिराज' असल्यामुळेच त्याला वगळले गेले असावे. या विधानामुळे क्रीडा विश्वाबरोबरच राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 19 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरु झाला. या सामन्यासाठी भारतीय संघाने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली, ज्यात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. मात्र, मोहम्मद सिराजला या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. सिराजला पूर्ण कसोटी संघातून वगळलेले नसून तो दौऱ्यासाठी निवडलेल्या संघाचा भाग आहे; पण पहिल्या सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले.

सिराजला बाहेर ठेवण्यावरुन भारतीय संघाचे (Team India) फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी स्पष्टीकरण दिले. सामन्याचे पाचही दिवस लक्षात घेऊन आणि या लढतीसाठी कोणता संघ अधिक योग्य ठरेल, याचा विचार करुन निवड केल्याचे त्यांनी सांगितले. सिराजबाबत कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनीही सिराजला संधी न मिळण्याबाबत आश्चर्य आणि प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर इम्रान मसूद यांनी केलेल्या भेदभावाच्या आरोपाने या प्रकरणाला राजकीय वळण दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

T20 Cricket: दिल्लीचे आव्हान गोव्यासाठी अवघड, 23 वर्षांखालील महिला टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेत पराभव

Tiger Conservation: गोव्यातील वाघ गणनेचा अहवाल कुठे अडकला? निष्कर्ष जाहीर करण्याची राजेंद्र केरकर यांची मागणी

Kakoda Sewage Treatment Plant: जुवारीच्या पूरक्षेत्रात सांडपाणी प्रकल्प; खारफुटी नष्ट होत असल्याचा आरोप, न्यायालयाची नोटीस

धक्कादायक! ECG सामान्य असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक, छातीत दुखत असल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT