Mohammed Siraj: "मियाँ, बॅग पॅक करो और निकलो"! सूर्याचा फोन आला आणि..; मोहम्मद सिराजने सांगितली वर्ल्डकप प्रवासाची स्टोरी

Mohammed Siraj T20 World Cup: नशिबात लिहिले आहे तेच घडते, अशी भावना मोहम्मद सिराजने टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात शानदार कामगिरी केल्यानंतर सांगितले.
Mohammed Siraj T20 World Cup
Mohammed Siraj T20 World CupDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: कुटुंबासोबत घरी आराम करत होतो. आपल्या फेव्हरिट रेयाल माद्रिदचा सामना पाहण्याचा प्लान करीत होतो; पण नशिबात लिहिले आहे तेच घडते, अशी भावना मोहम्मद सिराजने टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात शानदार कामगिरी केल्यानंतर सांगितले.

विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर कर्णधार सूर्यकुमार यादवचा फोन आला. म्हणाला, मियाँ, बॅग पॅक करो और मुंबई आ जाओ... मी म्हटले, भाई मजाक मत करो. ये तो होनेवाला नही है... त्यावर सूर्या म्हणाला.... मी मस्करी करत नाहीये, तुझी विश्वकरंडक स्पर्धेत निवड झालीय... थोड्या वेळात निवड समितीचे सदस्य प्रग्यान ओझा यांनीही मला हाच निरोप दिला...

नशिबात लिहिले आहे ते चुकत नाही, यावर विश्वास बसला आणि मी तडक मुंबईला निघालो... असा टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत हर्षित राणा जायबंदी झाल्यामुळे ऐनवेळी आणि अचानक संधी मिळालेला मोहम्मद सिराज आपली भावना व्यक्त करत होता.

हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमरा आजारी पडल्यामुळे सिराजला ध्यानीमनी नसतानाही थेट सलामीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि नेहमीप्रमाणे झोकून देत त्याने तीन विकेटची कामगिरी केली.

सिराज भारतीय संघाच्या टी-२० संघाचा सदस्य नाही. परिणामी, भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करीत असताना सिराज रणजी सामन्यांत खेळत होता. आंध्र प्रदेशचा तो खेळाडू असून दोन सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्वही केले होते.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी मूळ संघात तुझी निवड नव्हती, त्यामुळे पुढचा तुझा प्लान काय होता? या प्रश्नावर सिराज म्हणाला, १५ तारखेला रेआल माद्रिदचा सामना पाहायला जाणार होतो आणि त्यानंतर रमजानची तयारी करणार होतो.

Mohammed Siraj T20 World Cup
T20 World Cup 2026: "निष्काळजीपणा महागात पडेल..." सनी पाजींकडून टीम इंडियाला धोक्याचा इशारा, फलंदाजांवर ओढले ताशेरे

सूर्यकुमारचा फोन येण्याअगोदर संघातील स्ट्रेन्थ आणि कंडिशन प्रशिक्षक ॲड्रियन ली रॉक्स यांनी मेसेज केला आणि तुझा प्लान काय आहे, अशी विचारणा केली. तुम्ही मला आता मेसेज करू नका. मी चार दिवसांचे दोन रणजी सामने खेळलोय. मला आता विश्रांती घ्यायचीय. त्यानंतर पाहू... असे उत्तर मी त्यांना दिले होते.

मुंबईसाठी विमानात बसल्यावर आपण स्वप्नात तर नाही, याची जाणीव करून घेत होतो. कारण कोणत्याही परिस्थितीत या विश्वकरंडक स्पर्धेत आपल्याला खेळायला मिळेल, असे वाटत नव्हतेच, असे त्याने सांगितले.

Mohammed Siraj T20 World Cup
T20 World Cup 2026: पाकड्यांची नाचक्की! 148 धावांच्या टार्गेटसमोर नेदरलँडच्या गोलंदाजांनी पाकला नाचवलं; बाबर-आगा 'सपशेल फेल'

सिराज पुढे म्हणाला, विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी वर्षभरापासून सुरू होती आणि आपण त्या संघाचा भाग नव्हतो; पण देवाच्या मनात वेगळेच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com