Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Ranking: सिराजचा नंबर वनच्या सिंहासनावर कब्जा! गिलचीही गरुडझेप

वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर आला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Ranking: भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध इंदोरला झालेला तिसरा वनडे सामना 90 धावांनी जिंकला. याबरोबरच न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिकाही भारताने 3-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची कामगिरीही चांगली झाली. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत त्याला फायदा झाला आहे.

आयसीसीने बुधवारी खेळाडूंची ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार आता मोहम्मद सिराज गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याने ट्रेंट बोल्टला मागे टाकत हा अव्वल क्रमांक मिळवला. तसेच ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूडनेही दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

साल 2019 मध्ये पहिला वनडे सामना खेळल्यानंतर तीन वर्षात त्याला भारताच्या वनडे संघात जागा मिळाली नव्हती. मात्र गेल्यावर्षी सुरुवातीलाच त्याने वनडेत पुनरागमन केले. त्यानंतर मात्र तो भारताच्या संघातील प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याने 2022 पासून वनडे क्रिकेटमध्ये 20 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.

सिराजने 2023 मध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 9 विकेट्स आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

सिराजची वनडे क्रमवारीत गोलंदाजी यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच्याकडून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी करवून घेतलेल्या तयारीचाही यात मोठा वाटा आहे.

सिराजचे आता क्रमवारीत 729 रेटिंग पाँइंट्स झाले आहेत. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोश हेजलवूडपेक्षा केवळ 2 रेटिंह पाँइंट्सने पुढे आहे. हेजलवूडचे 727 रेटिंग पाँइंट्स आहेत.

त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 4 विकेट्स घेतलेल्या भारताच्या मोहम्मद शमीलाही क्रमवारीत फायदा झाला असून तो आता 11 स्थानांची उडी घेत 32 व्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान, गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये केवळ सिराज हा एकच भारतीय आहे. त्याच्यानंतर भारतीय गोलंदाजाची सर्वोच्च क्रमवारी 20 आहे. कुलदीप यादव 20 व्या क्रमांकावर आहे.

(Mohammed Siraj claiming the No.1 spot on ICC Men's ODI Player Rankings for bowlers)

शुभमन गिलचीही गरुडझेप

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एक द्विशतक आणि एक शतकासह 360 धावा करणाऱ्या शुभमन गिलनेही आता वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

या क्रमवारीत त्याच्या पाठोपाठ भारताचा विराट कोहली सातव्या आणि रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर आला आहे. विराटची क्रमवारी घसरली आहे, तर रोहितची वधारली आहे. त्यामुळे आता फलंदाजांच्या यादीत एकूण तीन भारतीय क्रिकेटपटू पहिल्या 10 जणांमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT