Mohammed Shami  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मोहम्मद शमीने रचला इतिहास, ट्रेंट बोल्टला मागे टाकत पॉवरप्लेमध्ये बनला नंबर 1 गोलंदाज

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात शुभमन गिल आणि मोहित शर्मा यांनी शानदार कामगिरी केली. त्याचवेळी, मोहम्मद शमीने 2 विकेट घेत एक मोठा विक्रम केला.

मोहम्मद शमीने ट्रेंट बोल्टला मागे टाकले

गुजरात टायटन्सचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आयपीएल 2023 मध्ये खूप चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. या क्षणी तो पर्पल कॅप धारक देखील आहे. शमी सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजी करायला येतो. त्याला पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेणे आवडते.

दरम्यान, शमीने पॉवरप्लेमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत. यासह, तो आयपीएलच्या (IPL) इतिहासातील एकाच मोसमात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. इतर कोणत्याही गोलंदाजाने एका हंगामातील पॉवरप्लेमध्ये यापेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. शमीने ट्रेंट बोल्ट आणि मिचेल जॉन्सनला मागे टाकले आहे.

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स:

मोहम्मद शमीने 17 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत, तर ट्रेंट बोल्टने 2020 च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी पॉवरप्लेमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत.

त्याचवेळी, 2013 च्या हंगामात, मिचेल जॉन्सनने एका सत्राच्या पॉवरप्लेमध्ये 16 विकेट घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आता शमीच्या नावावर आहे.

एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

1. मोहम्मद शमी - 17 विकेट, वर्ष 2023

2. ट्रेंट बोल्ट - 16 विकेट, वर्ष 2020

3. मिचेल जॉन्सन - 16 विकेट, वर्ष 2013

4 धवल कुलकर्णी - 14 विकेट्स, वर्ष 2016

5. दीपक चहर - 15 विकेट, वर्ष 2019

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire : गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT