Mohammad Shami Saves Man's Life Instagram
क्रीडा

Mohammad Shami: शमी बनला देवदूत! अपघात झालेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, पाहा Video

Shami Saves Man's Life: शमीने त्याच्या समोरच कार अपघात झालेल्या एका व्यक्ती मदत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

Mohammed Shami Saves unkown person's Life After car Accident, Video Viral:

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अनेकदा भारतीय संघासाठी मैदानात तारणहार बनला आहे. पण मैदानाबाहेरही शमी एका संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी तारणहार ठरला. शमीने कार अपघातात झालेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहे, याबद्दल त्याने स्वत:च व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

शमीने शनिवारी रात्री एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्याने सांगितले की नैनीतालजवळ एक कार अपघात झाला, ज्यावेळी तो देखील तिथे होता आणि त्यानंतर तो लगेचच मदतीसाठी धावला.

शमीने दिलेल्या माहितीनुसार तो कारमध्ये असताना त्याच्या समोरच एक कार टेकडीवरून खाली पडली. ते पाहून लगेचच शमी मदतीसाठी गेला. त्याने आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी मिळून त्या कारमधील व्यक्तीला बाहेर काढले.

व्हिडिओमध्ये दिसते की त्या व्यक्तीला सुदैवाने मोठी इजा झालेली नाही, तसेच शमी त्याच्यावर प्रथमोपचार करताना दिसत आहे.

शमीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'तो खूप भाग्यशाली आहे की देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले. नैनीतालजवळ माझ्या कारसमोरच त्याची कार एका टेकडीवरील रोडवरून खाली कोसळली. आम्ही त्याला सुरक्षित बाहेर काढले.'

शमीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याचे सध्या कौतुक होत आहे.

दरम्यान, शमी सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर विश्रांतीवर आहे. या स्पर्धेत तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने भारताला अनेक सामने जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तो वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरला. त्याने 7 सामन्यांत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या. यातील तीन सामन्यात त्याने 5 विकेट्स घेण्याचाही कारनामा केला.

याचदरम्यान तो भारताचा वनडे वर्ल्डकपमधील देखील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये 18 सामन्यांत 55 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताला 50 हून अधिक वर्ल्डकप विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

SCROLL FOR NEXT