क्रीडा

Mitchell Marsh: मार्शने वर्ल्डकपवर पाय ठेवण्याबद्दल शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'मला खूपच...'

Mohammad Shami: ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता, याबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Mohammed Shami react on Mitchell Marsh Putting Feet On Cricket World Cup:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 19 नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियाने अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले. त्यामुळे भारताला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली होती, भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही मोठे योगदान राहिले. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज ठरला. दरम्यान, अंतिम सामन्यानंतर त्याने या स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मिचेल मार्शच्या कृतीवर शमी व्यक्त

ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत वर्ल्डकप जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष केला होता. यादरम्यानचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या फोटोमध्ये त्याने वर्ल्डकपवर पाय ठेवलेले दिसत होते. त्यावर भारतातून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. आता याबद्दल शमीनेही मत व्यक्त केले आहे. तो मार्शच्या या कृतीने खूश नाही.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मार्शच्या कृतीबद्दल शमी म्हणाला, 'मला वाईट वाटले. जगातील सर्व संघ ज्या ट्रॉफीसाठी झगडत असतात, ती ट्रॉफी तुम्ही डोक्यावर मिरवली पाहिजे. त्या ट्रॉफीवर पाय ठेवणे, मला आवडलेले नाही.'

...तर कदाचीत जिंकलो असतो - शमी

दरम्यान, एएनआयशी बोलताना शमीने भारताच्या अंतिम सामन्यातील पराभवाबद्दलही प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'आमच्याकडे खूप धावा नव्हत्या. जर आमच्या 300 पेक्षा जास्त धावा झाल्या असत्या, तर आम्ही सहज त्याचा बचाव करू शकलो असतो. पण मला वाटत नाही की कोणत्याही एका गोष्टीला जबाबदार धरणे योग्य आहे. आम्ही संघ म्हणून कुठे होतो, हे पाहाणे जास्त महत्त्वाचे आहे. संघ म्हणून काम करणे जास्त महत्त्वाचे आहे. एक गोष्ट सांगायची झाली तर मी म्हणेल की कदाचीत आमच्या धावा कमी झाल्या.'

अंतिम सामन्यात भारताचा पराभव

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. भारताकडून भारताकडून केएल राहुलने 66 धावांची आणि विराट कोहलीने 54 धावांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. ऑस्ट्रेलिया सुरुवातीला 47 धावात 3 विकेट्स गमावल्याने अडचणीत सापडले होते. पण नंतर सलामीवीर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.

ट्रेविस हेडने 120 चेंडूत 15 चौकार 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. तसेच लॅब्युशेनने 110 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT