Babar Azam & Mohammad Rizwan Dainik Gomantak
क्रीडा

नंबर वन बनल्यानंतर Mohammad Rizwan ची आली प्रतिक्रिया, 'राजा हा राजाच राहतो...'

Mohammad Rizwan: पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ICC T20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

दैनिक गोमन्तक

Babar Azam & Mohammad Rizwan: पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ICC T20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि सहकारी बाबर आझमला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. रिझवानने दुबईत हाँगकाँगविरुद्ध 57 चेंडूत 78 धावांची खेळी केल्यानंतर भारताविरुद्ध 51 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले. या कामगिरीच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 815 रेटिंग पॉइंट्स मिळवले.

दरम्यान, रिझवान हा बाबरनंतरचा तिसरा पाकिस्तानी फलंदाज आहे, जो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर एकूण 1,155 दिवसांपासून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यापूर्वी मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) 20 एप्रिल 2008 ते 27 फेब्रुवारी 2009 पर्यंत 313 दिवस अव्वल स्थानावर होता.

दुसरीकडे, टी-20 मध्ये नंबर वन बॅट्समन बनल्यानंतर रिझवान टी-20 क्रिकेटचा बादशहा बनला आहे. तरीही त्याने आपला कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) टी-20 चा बादशाह म्हटले आहे. रिझवानने ट्विट करत म्हटले की, “फक्त अल्लाहकडून. अल्लाहशिवाय नाही. कॅप्टन बाबर आझमच्या कारकिर्दीचा 1156 वा दिवस म्हणून मोजा. कर्णधार किंवा मी वेगळे नाहीत. राजा हा राजाच राहतो. आपण सर्व एक आहोत. धन्यवाद''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT