Mohammad Rizwan Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 Rankings: बाबर आझमची खुर्ची हिरावून घेतली, रिझवान बनला नंबर वन फलंदाज

Mohammad Rizwan: यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा T20 क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे.

दैनिक गोमन्तक

Mohammad Rizwan: ICC T20 क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील क्रमांक एकचे स्थान त्याच्याच सहकाऱ्याने हिरावून घेतले आहे. त्याची खुर्ची पाकिस्तान संघाचा सलामीवीर आणि सहकारी फलंदाज मोहम्मद रिझवानने हिसकावून घेतली आहे. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा T20 क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

दरम्यान, मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) हाँगकाँग आणि भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला आयसीसी (ICC) टी-20 क्रमवारीत मदत झाली. रिझवानच्या खात्यात सध्या 815 रेटिंग गुण आहेत, तर बाबर आझमच्या खात्यात 794 रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज एडन मार्कराम 792 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 775 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

तसेच, श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 72 धावांची खेळी करणारा रोहित शर्मा 17 व्या स्थानावरुन 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप 10 मध्ये सूर्यकुमार यादव हा एकमेव भारतीय आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन टॉप 20 मध्ये आहेत. बाबर आझम एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT