Mohammad Rizwan Dainik Gomantak
क्रीडा

मोहम्मद रिझवान बनला पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट 'क्रिकेटपटू'!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) गेल्या वर्षी त्यांच्या अनेक खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल सन्मानित केले.

दैनिक गोमन्तक

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली मात्र त्यांना सेमिफायनलमध्ये अपयश आले. बाबर आझमने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. यातच आता त्याच्याबरोबर पाकिस्तान संघाचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) देखील आपली कामगिरीमध्ये सुधारणा करत आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये भारताविरुध्द सर्वोत्तम कामगिरी केली. याच पाश्वभूमीवर त्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सन्मान केला आहे.

दरम्यान, 2022 च्या सुरुवातीपासून गेल्या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये क्रिकेट क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) बोर्डाने गेल्या वर्षी त्यांच्या अनेक खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल सन्मानित केले. यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) यावर्षी सन्मान मिळाला आहे. तर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि वेगवान गोलंदाज हसन अली-शाहीन आफ्रिदी यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. रिझवानने 2021 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 1915 धावा केल्या, तसेच त्याने 54 विकेट्सही घेतल्या. यासोबतच रिझवानला सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटर म्हणूनही गौरविण्यात आले. रिझवानने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1326 धावा केल्या, हा एक विश्वविक्रम आहे.

दरम्यान उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन अलीला कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले. हसन अलीने गेल्या वर्षी 8 कसोटी सामन्यात 41 बळी घेतले होते, ज्यामध्ये 5 वेळा एका डावात 5 बळी घेतले होते, तर एका सामन्यात 10 बळी घेण्याचा चमत्कार त्याने केला होता.

त्याच वेळी, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला 2021 चा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले. एकदिवसीय क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबरने गतवर्षी 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 405 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने विराट कोहलीला मागे टाकत प्रथमच पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

पाकिस्तान महिला संघाची अनुभवी अष्टपैलू निदा दार हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू घोषित करण्यात आले. या दिग्गज खेळाडूने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये एकूण 458 धावा केल्या आणि 11 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सर्वात प्रभावी कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. शाहीनला टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध 3 विकेट्स घेतल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT