आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या (ICC) क्रमवारीनुसार कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये मागे टाकले आहे. मागील काही सामन्यापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी न खेळणे महागात पडले. बाबरने (Babar Azam) विराटला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आठवे स्थान पटकावले आहे. बाबरने विराटला (Virat Kohli) वनडे आणि टी-20 मध्ये मागे टाकले आहे.
कोहलीचे क्रमवारीत नुकसान
कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत विराटच्या क्रमवारीमध्ये दोन अंकानी घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी बाबरने एका स्थानाने प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) बाबरने तीन फॉरमॅटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत विराटला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर पहिल्या तर विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी बाबर दुसऱ्या तर विराट टी-20मध्ये 11व्या क्रमांकावर आहे.
विराटसाठी गेली काही वर्षे चांगली गेली नाहीत
विराटसाठी गेली काही वर्षे चांगली गेली नाहीत. कसोटी, एकदिवसीय किंवा T20 या तिन्ही फॉरमॅटचे मिश्रण करुनही विराट नोव्हेंबर 2019 पासून शतक झळकावू शकलेला नाही. डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत विराटने 52 सामन्यांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 39.20 च्या सरासरीने 2078 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 94 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर या मध्यांतरात बाबरने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
बाबर आझम शानदार फॉर्मात
बाबरने डिसेंबर 2019 पासून 60 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.01 च्या सरासरीने 2857 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 158 धावा आहे. या मध्यांतरात भारताचे दोन फलंदाज अव्वल पाचमध्ये आहेत. केएल राहुलने (KL Rahul) 46 सामन्यांमध्ये 2181 धावा केल्या असून रोहित शर्माने डिसेंबर 2019 पासून 38 सामन्यांमध्ये 2083 धावा केल्या आहेत.
गेल्या वर्षभरात बाबरने विराटपेक्षा जास्त धावा केल्या
गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर बाबरने विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. बाबरने 1 जानेवारी 2021 पासून 43 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 40.93 च्या सरासरीने 1760 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर विराटने 24 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.07 च्या सरासरीने 964 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, त्याला एकही शतक झळकावता आले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.