Mithali Raj Dainik Gomantak
क्रीडा

India Women's Cricket: विश्वचषक जिंकल्यानंतर बदलणार चाहत्यांची मानसिकता

भारतीय संघ 2022 चा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला, तर उत्साही भारतीय चाहत्यांचा आवाज न्यूझीलंडपर्यंत ऐकू येईल

दैनिक गोमन्तक

4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या दौऱ्यात टीम इंडियाच्या हाती काही लागले नाही, टिमला 4 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चौथ्या वनडेतील पराभवानंतर टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने मोठे वक्तव्य केले आहे. विश्वचषक जिंकल्याने भारतीय चाहत्यांचा महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास मिताली राजने (Mithali Raj) व्यक्त केला. (icc womens world cup 2022)

भारतीय संघ 2017 मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेला शेवटचा विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता. इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषक भारतीय महिला क्रिकेटसाठीही महत्वाचा ठरला आणि चाहत्यांमध्ये खेळाडूंची क्रेझही खूप वाढली. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली, 'मला अजूनही 2017 चा अंतिम सामना चांगलाच आठवतो, चाहत्यांच्या त्या भावना अजूनही माझ्या मनात आहेत आम्ही तो विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ आलो होतो. मात्र हाऊसफुल्ल भरलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांसमोर आम्ही फायनल हरलो. त्यामुळे अजूनही चाहते दुखावले आहे. मात्र माझ्या नेतृत्वाखाली मी टीम इंडियाला 3 पैकी 2 आयसीसी विश्वचषक फायनलमध्ये नेले ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.'

भारतीय संघ 2017च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता आणि 2020 च्या T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही फायनलमधील पराभवाची आठवण करून देताना मिताली राज म्हणाली, 'या सामन्यातील पराभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि आम्ही या विश्वचषकात आणखी चांगल्या अनुभवासह उतरू. चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हेही दाखवून दिले आहे. या विजयाचा प्रभाव खूप मोठा असेल, तो आमच्या खेळाडू, कुटुंब आणि चाहत्यांसाठी नक्कीच बदल घडवून आणेल.'

भारतीय संघ 2005 आणि 2017 मध्ये महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 2005 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 2017 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पराभूत झाला होता. 2020 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT