जाणून घ्या कोण आहे 16 वर्षांचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसेनला (Magnus Carlsen) पराभवाचा दणका देणारा आर. प्रज्ञानंद
Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter
Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

Chess Grand Master Praggnanandhaa: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) जागतिक क्रमवारीत नंबर-1 बुद्धिबळ मास्टर मॅग्नस (Magnus Carlsen) कार्लसनचा पराभव करून मोठा धक्का दिला आहे. हा पराक्रम गाजवणाऱ्या प्रज्ञानंदचे वय अवघे 16 वर्षे आहे, तर कार्लसनचे वय त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट म्हणजेच 31 वर्षे आहे.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

रविवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लसनला 39 चालींमध्ये चित केले. एअरथिंग्ज मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने ही कामगिरी केली आहे.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

चेन्नईचा रहिवासी प्रज्ञानंदने दिग्गजांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2018 मध्ये त्याने बुद्धीबळात इतिहास रचला आहे. त्यानंतर प्रज्ञानंद जगातील दुसरा सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

तेव्हा प्रज्ञानंदचे वय फक्त 12 वर्षे 10 महिने होते. यासह तो दुसरा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टरचा किताब युक्रेनच्या सर्गेई करजाकिनच्या नावावर आहे, त्याने वयाच्या 12 वर्षे 7 महिन्यांत ही कामगिरी केली होती.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

प्रज्ञानंद एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना त्याने बुद्धिबळ खेळावे असे वाटत नव्हते. पण प्रज्ञानंदची बहीण वैशाली बुद्धिबळ खेळायची. आपल्या बहिणीला पाहून प्रज्ञानंदची बुद्धिबळातील आवड वाढली आणि तो आज इथपर्यंत पोहोचू शकला.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

प्रज्ञानंदचा जन्म 10 ऑगस्ट 2005 रोजी चेन्नईमध्येच झाला. त्याचे प्रशिक्षक आरबी रमेश आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी प्रगनानंदने वळपास 40 देशांना भेटी दिल्या आहेत. यादरम्यान प्रशिक्षक रमेशही त्याच्यासोबत असतात.

Chess Grand Master Praggnanandhaa
Chess Grand Master PraggnanandhaaTwitter

एकेकाळी बुद्धिबळ खेळणे सोडून दे म्हणणाऱ्या कुटूंबाला प्रज्ञानंदवर अभिमान आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन भारतीय स्टार विश्वनाथ आनंद देखील त्याची स्तुती करताना दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com