Mohammad Hafeez | Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli: 'मुर्खपणा!', विराटच्या शतकावर टीका करणाऱ्या हाफिजला इंग्लंडच्या दिग्गजानं सुनावलं

Virat Kohli Century: पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजने विराट कोहलीच्या 49 व्या शतकावर टीका केल्यानंतर त्याला इंग्लंडच्या दिग्गजाने खडेबोल सुनावले आहेत.

Pranali Kodre

Michael Vaughan slams Mohammad Hafeez for criticizing Virat Kohli's 49th ODI Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघाला 243 धावांनी पराभूत करत सलग आठव्या विजयाची नोंद केली होती. कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते.

विशेष म्हणेज विराटचा 5 नोव्हेंबरला त्याचा 35 वा वाढदिवसही साजरा केला होता. दरम्यान असे असले तरी विराटच्या शतकावर काही जणांनी टीका केली होती, यात पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजचाही समावेश आहे. पण त्याच्या टीकेला इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू मायकल वॉन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

विराटने या सामन्यात 121 चेंडूत 10 चौकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक आहे. त्यामुळे विराटने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

दरम्यान, विराटने त्याच्या विक्रमासाठी स्वार्थीपणे धीम्यागतीने ही शतकी खेळी केल्याची टीका मोहम्मद हाफीजसह अनेकांनी केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार हाफिजने म्हटले होते की शेवटच्या षटकांवेळी विराटचे लक्ष जोखीम घेऊन आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्यापेक्षा आपल्या शतकावर होते.

यावर मायकल वॉन यांनी ट्वीटरवर उत्तर दिले आहे की 'मोहम्मद हाफिज, भारताने शानदार क्रिकेट खेळत 8 संघांना पराभूत केले आहे.'

'विराटच्या खात्यात आता 49 वनडे शतके आहेत आणि त्याने त्याची खेळी कठीण खेळपट्टीवर केली होती, त्याने अँकरची भूमिका बजावली होती. त्याच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला २०० पेक्षा जास्त धावांनी पराभूत केले. तुझे बोलणे मुर्खपणाचे आहे.'

भारताचा विजय

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी केली. श्रेयसने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर रोहित शर्माने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाग 326 धावांचा टप्पा गाठला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सिन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT