Michael Neser's catch Dainik Gomantak
क्रीडा

BBL: अद्भूत ! बाउंड्री लाईनच्या बाहेर असूनही क्रिकेटरने घेतला कॅच, पाहा असं घडलं तरी कसं

Pranali Kodre

Michael Neser's catch: क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा आगळ्या वेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. तसेच खेळाडू क्षेत्ररक्षण करतानाही जोखीम घेण्यास मागेपुढे पाहात नसल्याचेही दिसते. चेंडू पकडण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. अशीच एक घटना नुकतीच बीग बॅश लीगमध्ये रविवारी झालेल्या ब्रिस्बेन हिट विरुद्ध सिडनी सिक्सर्स सामन्यात घडली.

या सामन्यात ब्रिस्बेन हिटने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सिडनी सिक्सर्सच्या जॉर्डन सिल्कचा मायकल नासीरने बाऊंड्री लाईनजवळ 19 व्या षटकात अविश्वसनीय झेल घेत त्याला बाद केले. त्यावेळी सिल्क 23 चेंडूत 41 धावांवर खेळत होता. तसेच चांगल्या लयीत खेळत होता. त्यामुळे त्याची विकेट महत्त्वाची होती.

झाले असे की चांगल्या लयीत खेळणाऱ्या सिल्कने 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारला. त्यावेळी लाँग-ऑफला क्षेत्ररक्षण करणाऱ्या नासीरने बाउंड्री लाईनजवळ तो चेंडू पकडला. पण तोल जाऊन तो बाउंड्री पार करून जाईन म्हणून त्याने तो चेंडू हवेत फेकला. त्यानंतर तो बाउंड्री पार करून गेला.

पण तो चेंडू बाउंड्री बाहेरच्या जागेतच पडेल म्हणून नासीरने पुन्हा हवेत उडी घेत तो चेंडू पकडला आणि हवेत असतानाच पुन्हा चेंडू वर फेकला. त्यानंतर मैदानात येत तो चेंडू झेलला.

नासीरच्या या उत्तम क्षेत्ररक्षणामुळे सिल्कला त्याची विकेट गमवावी लागली. ही विकेट महत्त्वाचीही ठरली. कारण ब्रिस्बेन हिटने अखेरीस हा सामना केवळ 15 धावांनी जिंकला. दरम्यान, नासीरच्या या झेलाचे कौतुक होत आहे.

पण, नासीरने केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक होत असले, तरी झेलच्या या नियमाबद्दल अनेकांना शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबनुसार झेल घेताना चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा पहिला संपर्क बाऊंड्रीच्या लाईनच्या आत मैदानात व्हायला हवा, तसेच बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाचा चेंडू आणि जमीनीशी एकत्र संपर्क नाही झाला पाहिजे. या नियमानुसार नासीरने घेतलेला झेल योग्य होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT