Lionel Messi vs Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

Messi - Ronaldo आज आमने-सामने! कधी अन् कुठे पाहू शकता मॅच, जाणून घ्या एका क्लिकवर

गुरुवारी मेस्सी आणि रोनाल्डो एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

Pranali Kodre

Messi vs Ronaldo: दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे सर्वाधिक चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे या दोघांना खेळताना पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात, त्यातही त्यांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. आता पुन्हा एकदा गुरुवारी चाहत्यांना या दोघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या महिन्यात रोनाल्डोने सौदी अरेबियातील अल नासर क्लबबरोबर करार केला आणि आशिया फुटबॉलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अनेकांना वाटले होते की आता मेस्सी आणि रोनाल्डो एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार नाहीत. मात्र, त्यांना एकमेकाविरुद्ध खेळताना पाहाण्याची ही संधी एका मैत्रीपूर्ण सामन्यामुळे मिळणार आहे.

मेस्सीचा सहभाग असलेला पॅरिस सेंट-जर्मेन संघ (पीएसजी) सौदी अरेबियातील ऑल स्टार इलेव्हन (रियाध सिजन टीम) संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी सौदी अरेबियाचा दौऱ्यावर आला आहे.

दरम्यान, रियाध सिजन टीम अल हिलाल आणि अल नासर क्लबच्या खेळाडूंनी मिळवून बनवण्यात आली आहे. रोनाल्डो अल नासरचा भाग असल्याने तो या संघाचे नेतृत्वही करताना दिसणार आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या पॅरिस सेंट-जर्मेन संघात मेस्सीसह कायलिन एमबाप्पे, नेमार, हाकिमी अशा खेळाडूंचा समावेश आहे.

हा सामना पाहाण्यासाठी दोन मिलियनपेक्षाही अधिक तिकीटांसाठी मागणी होती, अशी चर्चा आहे. दरम्यान व्हीआयपी तिकीटाचा लिलाव करण्यात आला होता. त्याला 2.66 मिलियन डॉलरची बोली लागली आहे. हा सामना रियाधमधील किंग फाहद स्टेडियमवर होणार आहे.

विशेष म्हणजे अल नासरशी करार केल्यानंतर रोनाल्डोचा हा सौदी अरेबियातील पहिलाच सामना असणार आहे. तो अल नासरकडून त्याचा पहिला स्पर्धात्मक सामना रविवारी सौदी प्रो लीगमध्ये अल इत्तिफाकविरुद्ध खेळणार आहे.

मेस्सी-रोनाल्डो खेळलेत वर्ल्डकप

मेस्सी आणि रोनाल्डो गेल्याच महिन्यात फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा खेळले आहेत. पण, या सामन्यात ते आमने-सामने येऊ शकले नव्हते. रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर झाला होता, तर मेस्सी कर्णधार असलेल्या अर्जेंटिना संघाने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

दरम्यान, मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघे अखेरचे डिसेंबर 2020 मध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी मेस्सी बार्सिलोना क्लबकडून आणि रोनाल्डो युवेंटस क्लबकडून खेळत होता. त्यावेळी युवेंटसने बार्सिलोनाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते.

पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मैत्रीपूर्ण सामन्याबद्दल सर्वकाही...

- कधी होणार आहे पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामना?

पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामना गुरुवारी होणार आहे.

- किती वाजता होणार पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामना?

पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 ला सुरुवात होणार आहे.

- कुठे होणार आहे पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामना?

पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामना रियाधमधील किंग फाहद स्टेडियमवर होणार आहे.

- पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामन्याची लाईव्हस्ट्रीम भारतात कुठे पाहायला मिळेल?

पीएसजी विरुद्ध रियाध सिजन टीम मधील सामन्याची लाईव्हस्ट्रीम पीएसजीच्या युट्यूब चॅनेलवर, पीएसजी टीव्ही वेबसाईटवर आणि पीएसजीच्या अधिकृत फेसबुक हँडेलवर पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT