Cristiano Ronaldo: सौदीने रोनाल्डोसाठी 1600 कोटी रूपये मोजले, पण आता 'हा' गुन्हा माफ करणार की नाही?

संपुर्ण क्रीडा जगताचे लक्ष, अल नासर क्लबने रोनाल्डोशी केला आहे करार
Cristiano Ronaldo | Georgiana Rodriguez
Cristiano Ronaldo | Georgiana RodriguezDainik Gomantak

Cristiano Ronaldo: सौदी अरेबिया हा देश तेथील कठोर कायदे आणि नियमांसाठी ओळखला जातो. लग्न न करता जोडीदारासोबत एकत्र राहणे सौदी अरेबियात बेकायदेशीर मानले जाते. पण आता सौदीच्या अल नसर या फुटबॉल क्लबने रोनाल्डोला तब्बल 1600 कोटी रूपये मोजून दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. आणि रोनाल्डो बिना लग्नाचा त्याची गर्लफ्रेंड-पार्टनर जॉर्जिना रॉड्रिगेज हिच्यासोबत आपल्या मुसांसह एकत्र राहतो. त्यामुळे आता रोनाल्डोला या गुन्ह्यासाठी सौदी माफ करणार का, याची चर्चा क्रीडा वर्तुळात होऊ लागली आहे.

Cristiano Ronaldo | Georgiana Rodriguez
Lionel Messi: वर्ल्डकप विजयानंतर मेस्सीचं इंस्टाग्रामवरील वजन वाढलं, आता टाकणार रोनाल्डोला मागे?

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज दीर्घकाळापासून एकत्र राहत आहेत. रियल माद्रिदकडून खेळताना 2016 मध्ये रोनाल्डोची जॉर्जिनाशी भेट झाली होती. रोनाल्डो आणि रॉड्रिग्जचे अद्याप लग्न झालेले नाही. त्यांना बेला आणि अलाना अशी दोन अपत्ये आहेत. सौदीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार जॉर्जिना अल-नसर फुटबॉल क्लबच्यावतीने नॉन-टुरिस्ट व्हिसावर येऊ शकते. त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणून ती एका वर्षासाठी टुरिस्ट व्हिसा घेऊ शकते. टुरिस्ट व्हिसाच्या मदतीने जॉर्जिनाला देशात 90 दिवस राहण्याची परवानगी दिली जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार रोनाल्डो आणि जॉर्जिना सौदी अरेबियातील कायदा मोडून एकत्र राहण्यास तयार आहेत. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल रोनाल्डोला सौदी अधिकाऱ्यांकडून शिक्षा होण्याची शक्यता नाही.

Cristiano Ronaldo | Georgiana Rodriguez
India vs Sri Lanka: 'या' खेळाडूची कारकीर्द टी-20 मालिकेने संपली! 'टीम इंडियासाठी बनला खलनायक

अधिकारी आता अशा प्रकरणांमध्ये मवाळ भूमिका घेतात आणि कोणावरही शिक्षा ठोठावण्याचे टाळतात. पण गुन्हा घडला तर हे कायदे नक्कीच वापरले जातात, असे एका वकीलाने सांगितले. तर दुसऱ्या एका वकीलाच्या माहितीनुसार सौदी कायदा लग्नाशिवाय एकत्र राहण्यास मनाई करतो. पण सौदी अरेबियाचे अधिकारी परराष्ट्र व्यवहारात ढवळाढवळ करत नाहीत. सौदीमध्ये लिव्ह-इन बेकायदेशीर आहे, पण अलीकडच्या काळात येथील सरकारने याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. परदेशी नागरिकांच्या बाबतीत अधिकारी हस्तक्षेप करत नाहीत. 2017 मध्ये मोहम्मद बिन सलमान क्राऊन प्रिन्स झाल्यापासून सौदी अरेबियाने नागरी हक्क, विशेषत: महिलांच्या हक्कांबाबत बरीच प्रगती केली आहे. सौदी अरेबियातील जोडप्यांना हॉटेलमध्ये खोली घेण्यापुर्वी त्यांना विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com