Neymar, Lionel Messi, Kylian Mbappe together play from PSG ahead of the Ligue 1 season
Neymar, Lionel Messi, Kylian Mbappe together play from PSG ahead of the Ligue 1 season Canva/Dainik Gomantak
क्रीडा

Messi, Neymar, Mbappe: MNM घालणार का फुटबॉल मध्ये राडा?

Akshay Badwe

जर तुम्हाला सलमान, शाहरुख, आमिर एकाच चित्रपटात दिसले तर काय होईल हो? थिएटरसमोर रात्रंदिवस रांगा लागतील. असेच काहीतरी सध्या फुटबॉलच्या जगात होत आहे. जगातील 3 सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्जेन्टिनाचा लिओनेल मेस्सी (Lionel Messi), ब्राझीलचा नेमार (Neymar), फ्रान्सचा कायलन एम्बापे (Kylian Mbappe) एकाच क्लबकडून खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. फ्रान्सच्या पी एस जी (PSG) क्लब ने हा मान मिळवत फुटबॉल विश्वाला एक वेगळी ओळख करुन देणार यात काही वावगे नाही. (Messi, Neymar, Mbappe: MNM to rule the footballing world)

अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार मेस्सी याने मागील आठवड्यात एफ सी बार्सिलोना बरोबरचे एक अविस्मरणीय नात्याला राम-राम ठोकत थेट फ्रान्स गाठले. ज्या चर्चेला गेल्या 2 ते 3 वर्षांपासून उधाण आले होते त्याला मेस्सीने पूर्णविराम दिला आहे. मेस्सीसाठी पी एस जी ने 4 कोटी 10 लाख डॉलर रकमेचा करार केला आहे. या करारामध्ये नोंद केल्याप्रमाणे मेस्सी आता या क्लबमधून जून 2023 पर्यंत खेळेल. पी एस जी संघ आपल्या खेळाबरोबरच महागड्या खेळाडूंसाठी ओळखला जातो. पी एस जीचे संचालक नसीर अल खेलाफी हे स्वतः व्यावसायिक आहेत. एकंदरीत त्यांना जगातील सगळेच उत्कृष्ट खेळाडू त्यांच्या संघाकडून खेळावेत अशी इच्छा असावी. आता मेस्सी, नेमार आणि एम्बापे (MNM) हे जगावर राज्य करायला उतरतील यात काही शंका नाही.

अनेक वेळेला अश्या बऱ्याच त्रिकुटाची चर्चा झालेली आहे. या आधी बार्सिलोनासाठी मेस्सी, सॅम्युएल इटो आणि थियरी हेन्री तसेच रिअल माद्रिदसाठी गॅरेथ बेल, करीम बेन्झेमा आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो तर मैनचेस्टर युनायटेडसाठी वेन रुनी, कार्लोस तेवेझ आणि रोनाल्डो यांनी आपल्या फॅन्सवर एक वेगळी छाप पडली होती.

MNM यांनी या आधी देखील आपल्या खेळीने अनेकांना भुरळ पाडली आहे. नेमार हा पी एस जी बरोबर खेळण्या अगोदर बार्सिलोना या संघाकडून खेळत होता. आपल्या जादूगिरीने त्याने अनेक दिग्गज डिफेंडर, गोली यांना चक्रावून ठेवले. त्याच्या याच खेळीमुळे तर फ्रान्सच्या या क्लब ने त्याला आपल्याकडे खेळण्यास आमंत्रित केले आहे. एम्बापेबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. 'वंडरकिड' म्हणून ओळख असणाऱ्या या खेळाडूने स्वतःचे स्थान थेट फिफा विश्वचषकात दाखवून दिले. वयाच्या 18 व्या वर्षीच त्याने फ्रान्सच्या आंतराष्ट्रीय संघाकडून खेळाण्याचा मान मिळवला. या त्रिकुटाचा तिसरा भाग म्हणजे फुटबॉलचे दैवत लिओनेल मेस्सी! 34 व्या वर्षी देखील हा अर्जेन्टिनाचा खेळाडू एखाद्या 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल असा खेळ करीत आहे. मुळात ज्याचा जन्मतःच संबंध फुटबॉलशी आला त्याचे नाते या खेळासाठी एका वेगळीच पर्वणी आहे. 17 वर्षे बार्सिलोनासाठी खेळत असताना मेस्सीने 672 गोल मारले आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. आता तुम्ही विचार करा की हे तिघे एकत्र दिसले तर राडा तर होणारच ना? इतकेच काय तर स्पेनचा सर्जिओ रामोस, नेदरलँड चा विजनलडम आणि युरोपियन चॅम्पियन संघाचा गोली डोनारुमा या संघात असणार आहेत.

फुटबॉल हा खेळ कुठल्या 1 किंवा 2 खेळाडूंवर अवलंबून नसतो. मात्र ज्या संघात आता सगळेच 11 खेळाडू जर दिमाखदार असतील तर? काहीच दिवसांत पी एस जी आपल्या लीगला सुरुवात करेल. यामुळेच मेस्सी, नेमार आणि एम्बापे हे पी एस जीला चॅम्पियन्स लीग जिंकून देतील का हे पहाणे औत्सुख्याचा ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT