Cristiano Ronaldo and Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Messi - Ronaldo पुन्हा येणार आमने-सामने? सौदी अरेबियात PSG खेळणार सामना

मेस्सी आणि रोनाल्डो जानेवारीमध्ये पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात.

Pranali Kodre

Messi may face Ronaldo in Saudi Arabia: पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील अल-नासर क्लबबरोबर करार केला आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे तो आता अल-नासर संघाकडून खेळताना दिसेल. त्याने या क्लबबरोबर जवळपास 200 मिलियन युरोचा करार केला आहे.

मात्र, आता त्याने सौदी अरेबियातील क्बलशी करार केल्याने त्याचा युरोपमधील फुटबॉल प्रवास जवळपास संपल्यात जमा झाला आहे. याबद्दल त्यानेही भाष्य केले होते की 'युरोपमधील माझे काम झाले आहे.' त्यामुळे रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातील चॅम्पियन्स लीगमधील चूसरही संपुष्टात आली.

पण असे असले तरी यावर्षात हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण सध्या मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट-जर्मेन संघ (PSG) सौदी अरेबियात मिड-सिजन टूरचा भाग म्हणून जाणार आहेत. तिथे पीएसजी संघाला अल-हिलाल आणि अल-नासर संघातील खेळाडूंचा समावेश असलेल्या सौदी ऑल-स्टार इलेव्हन संघाशी 19 जानेवारी रोजी सामना खेळणार आहे.

त्यामुळे या सामन्यात मेस्सी आणि रोनाल्डो एकमेकांसमोर येऊ शकतात. सध्या मेस्सी अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर आणि या विजेतेपदाचे अर्जेंटिनामध्ये सेलिब्रेशन केल्यानंतर पीएसजी संघात परतला आहे. त्याचे पीएसजी संघात पुनरागमन झाल्यानंतर जोरदार स्वागतही झाले होते.

दरम्यान, आता तो आगामी काळात पीएसजी संघाकडून कशी कामगिरी करणार हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, पीएसजी संघात मेस्सीसह ब्राझीलचा नेमार आणि फ्रान्सचा कायलिन एमबाप्पेचाही समावेश आहे.

सध्या पीएसजी संघ लीग 1 स्पर्धेत 17 सामन्यांत 14 विजय मिळवून 44 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांचे या स्पर्धेत 2 सामने बरोबरीतही सुटले असून त्यांना एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच रोनाल्डोबद्दल सांगायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वी त्याचे आणि मँचेस्टर युनायटेडचे मार्ग परस्पर सहमतीने वेगळे झाले होते. रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडबरोबर काही वाद झाले होते. त्यामुळे त्यांच्यातील हा करार संपला.

त्यानंतर रोनाल्डोने अल-नासरबरोबर करार केला. दरम्यान, रोनाल्डोचे अद्याप अल-नासरकडून पदार्पण झालेले नाही. पण लवकरच तो संघाकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याने अल-नासर संघसहकाऱ्यांबरोबर सरावालाही सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT