खेळाडूंच्या या कामगिरी मागे, मोठा हात आहे तो यांच्या प्रशिक्षकांचा हात.  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: भारताच्या पदकांमागे 6 परदेशी प्रशिक्षकांचा हात

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची सर्व स्थरातून प्रशंसा होत आहे. कोरोनामुळे या ऑलिंपिकचे भवितव्य आधी आधांतरीच दिसत होते. मात्र ऑलिंपिक संघटनेने अश्यक्य ते शक्य करत ऑलिंपिक स्पर्धा सुरळीत पार पाडली. भारताला या ऑलिंपिकमध्ये 7 पदके (India won 7 medals in this Olympics) मिळाली आहे. भारतीय खेळाडू आज भारतात परत आले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि त्यांनी मिळालेल्या पदकामुळे खेळाडूंचा आज गौरव करण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या या कामगिरी मागे, मोठा हात आहे तो यांच्या प्रशिक्षकांचा, यात आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे पदक जिंकलेल्या 6 खेळाडूंचे प्रशिक्षक हे परदेशी (The coach of 6 players is a foreigner) आहेत. त्यामुळे टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय खेळाडूंच्या यशात परदेशी प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. (Men behind the medals: Seven foreigners)

जर्मनीचे उवे होन (मुख्य प्रशिक्षक) आणि डॉ क्लाऊस बार्टोनिट्झ (बायोमेकेनिकल तज्ञ), नीरज चोप्रा

१) जर्मनीचे उवे होन (मुख्य प्रशिक्षक) आणि डॉ क्लाऊस बार्टोनिट्झ (बायोमेकेनिकल तज्ञ)

खेळ: भालाफेकमध्ये

खेळाडू: नीरज चोप्रा

पदक: सुवर्णपदक

भाला फेकणाऱ्याचे शरीर धनुष्यासारखे आणि भाला हा बाणासारखे असते. असे डॉ. बार्टोनिट्झचे तत्त्वज्ञान आहे. नीरजला त्याच्या हलचाली मजबूत आणि शरीर लवचिक करण्यामागे हात आहे तो म्हणजे बार्टोनिट्झ यांचा कारण भाला फेकऱ्यांसाठी एक विशिष्ट प्रकारचा वर्कआऊट करावा लागतो. तो या जर्मन प्रशिक्षकानी नीरजकडून योग्य प्रकारे करुन घेत त्याला फिट ठेवले. 100 मीटर भाला फेकणारा एकमेव माणूस उवे होन यांच्यामुळे नीरजला 2018 च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले.

विजय शर्मा (मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक), मीराबाई चानू

२) विजय शर्मा (मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक)

देश : भारत

खेळाडू: मीराबाई चानू

खेळ: वेटलिफ्टिंग

पदक: रौप्य

मीराबाई चानू हिने 2014 मध्ये राष्ट्रीय विजेते शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली. शर्मा यांनी याआधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघाची जबाबदारी स्विकारली. मनगटाच्या दुखापतीमुळे शर्मा यांची कारकीर्द कमी झाली. 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानूला अपयश आल्यानंतर ती निवृत्तीच्या विचारात होती. परंतू प्रशिक्षक शर्मा आणि तिच्या आईने तिला निवृत्तीच्या विचारांपासून दूर नेले.

३) कमल मलिकोव

देश: रशिया

खेळाडू : रवी दहिया (57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती)

पदक: रौप्य

टोकियो ऑलिंपिकमध्ये पात्रतेसाठी सुशील कुमारला तयार केलेले मलिकोव यांनी भारताचे दोन वेळचे पदक विजेते फिटनेस ट्रेनर म्हणून होते. मलिकोव्हला एप्रिल 2021 पासून टार्गेट ऑलिंपिक अंतर्गत दहियाला मदत करण्यास नियुक्त करण्यात आले.

शको बेंटिनिडिस, बजरंग पुनिया

४) शको बेंटिनिडिस

देश: जॉर्जिया

खेळाडू: बजरंग पुनिया (65 किलो फ्रीस्टाईल कुस्ती)

पदक: बाँझ

बेंटिनिडिसयांनी बजरंगच्या 26 साव्या वर्षी सूत्रे हातात घेतली आणि 65 किलो वजनी गटात बजरंगचा उदय झाला. बेंटिनिडिस यांनी बजरंगच्या खेळाड सुधारणा झाली आणि त्याने कांस्य पदक पटकावले.

राफेल बर्गमास्को, लवलिना बोर्गोहेन

५) राफेल बर्गमास्को

देश : इटली

खेळाडू : लवलिना बोर्गोहेन

खेळ : महिला बॉक्सिंग

पदक: कांस्य

बर्गमास्को हे पाच वेळा राष्ट्रीय पदक विजेते होते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी बीजिंग, लंडन आणि रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होते. 2001 ते 2007 इटालियन महिला संघाचे प्रशिक्षक होते. 2017 मध्ये बर्गमास्को यांनी भारताच्या युवा बॉक्सिंगची धुरा संभाळली. एका महिन्यानंतर त्यांना वरिष्ठ महिलांसाठी उच्च संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

पार्क ताई-संग, पी.व्ही.सिंधु

६) पार्क ताई-संग

देश: दक्षिण कोरिया

खेळाडू: पी.व्ही.सिंधु

खेळ: बॅडमिंटन

पदक : कांस्य

टोकियो ऑलिंपिकमध्ये सिंधुने आपल्या खेळाने सर्वांचीच मने जिंकली. तिचा खेळ ताकद आणि प्रभावी हाताच्या वेगावर होता. पार्क यांनी सिंधुच्या बचावावर चांगले काम केले आहे.

ग्राहम रीड, पुरुष हॉकी संघ

७) ग्राहम रीड

देश: ऑस्ट्रेलिया

संघ: पुरुष हॉकी

पदक: कांस्य

रिड यांनी भारताची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी भारतीय हॉकी संघाचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे अयोग्य वेळी महागड्या चुका होऊ नये यावर देखील काम केले. बेझियमविरोधात पराभवाटचा सामना करावा लागल्यानंतर जर्मनी विरुध्द संघनिवडीत रिड यांचा मोठा हात होता. त्यांनी संघाला कणखर बनविले. कोणत्याही संघाला घाबरु नये तर त्यांच्याशी बरोरबरीने लढावे असे त्यांनी धडे भारतीय संघाला दिले. त्याचे फळ आज टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने 41 वर्षनंतर पदक आणत इतिहास रचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT