Non-Striker Run Out Dainik Gomantak
क्रीडा

Mankading: बॉलर व्हिलन नाही! क्रिकेट नियम बनवणाऱ्या MCC कडून नॉन-स्ट्राकरला रनआऊट करण्यासाठी 'फुल सपोर्ट'

Pranali Kodre

MCC: क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नॉन-स्ट्रायकर एन्डच्या फलंदाजाला धावबाद करण्यावरून अनेक चर्चा होत आहेत. अशाप्रकार फलंदाजाला बाद करण्याला मंकडींग म्हणूनही ओळखले जाते. मात्र, आता क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबन क्रिकेट क्लबच्या जागतिक क्रिकेट समीतीने स्पष्ट केले आहे की नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजाला बाद करण्यात गोलंदाजांची चूक नसेल.

जागतिक क्रिकेट समीतीची मागील आठवड्यात दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली.

त्यानंतर अशा प्रकारच्या विकेटबाबत सर्वांनाच शांत राहण्यास जागतिक क्रिकेट समीतीने सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नॉन-स्ट्रायकरला गोलंदाजाने बाद करण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे क्रिकेट विश्वात दोन मतप्रवाह बनले होते. काहींचे मत आहे की अशाप्रकारची विकेट ही खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आहे. तर काहींनी अशाप्रकारे विकेट घेण्याला पाठिंबा दिला आहे.

अखेर एमसीसीने स्पष्ट केले आहे की 38.3 नियम याबाबत स्पष्टता देते. तसेच या नियमाला आयसीसीकडूनही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे याबद्दल सर्वांनीच शांत रहावे आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात गोलंदाजाने चेंडू हातातून सोडण्यापूर्वीच नॉन-स्ट्रायकरचे क्रिज सोडणाऱ्या फलंदाजाला धावबाद करणे, हे नियमात बसणारे असल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे.

एमसीसीने म्हटले आहे की 'महत्त्वाचे हे आहे की अशाप्रकारे बाद होण्याच्या नियमाशी जोडलेल्या सर्व वादांना आणि अफवांना संपवले जाऊ शकते. नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजाला नियमाचे पालन करावे लागले आणि गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रिजमध्ये राहणे गरजेचे आहे.'

'दुबईमध्ये याबद्दल चर्चा झाली की नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्यासाठी गोलंदाजांना दोषी ठरवले जाते. पण खरेतर धाव चोरण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतो. अशा परिस्थितीत चूक फलंदाजाची असून गोलंदाजाची नाही.'

त्याचबरोबर त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की अशाप्रकारे बाद करण्याआधी फलंदाजाला चेतावणी देण्याची गरज नाही. ज्याक्षणी पहिल्यांदा फलंदाज हा नियम तोडेल, त्याक्षणी त्याला गोलंदाज बाद करू शकतो.

जागतिक क्रिकेट समीतीमध्ये कुमार संगकारा, सौरव गांगुली, जस्टीन लँगर, ऍलिस्टर कूकसह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. दरम्यान, संगकाराने म्हटले आहे की 'गोलंदाज खलनायक नाहीत. प्रत्येक फलंदाजाकडे हा पर्याय असतो की त्याने क्रिजमध्ये रहावे किंवा धाव चोरण्याच्या प्रयत्नात क्रिज सोडण्याची जोखीम पत्करावी. तर नॉन-स्ट्रायकरने जोखीम घेतली, तर ते नक्कीच नियम तोडत आहेत.'

त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की गोलंदाज नॉन-स्ट्रायकरला नियमानुसार धावबाद करू शकतो. तसेच अशाप्रकारच्या विकेटलाही सामन्य धावबादासारखेच समजण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT