Mayank Agarwal X/mayankcricket
क्रीडा

Mayank Agarwal: हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करत स्वत: मयंकनेच दिले हेल्थ अपडेट; म्हणाला, 'मला आता...'

Mayank Agarwal Post: मयंक अगरवालला संशयित पाणी पिल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर आता त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट दिले आहेत

Pranali Kodre

Mayank Agarwal gave update on social media after Hospitalized For Drinking Poisonous Liquid:

मंगळवारी रात्री एका बातमीने भारतीय क्रिकेट विश्वास खळबळ उडवली होती. कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार मयंक अगरवाल याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजले होते. आता त्याने स्वत: बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

खरंतर कर्नाटककडून त्रिपूराविरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर मयंक पुढील सामना सुरतला जाणार होता. पण, प्लेन निघण्यापूर्वीच त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधील द्रव्य त्याने पाणी म्हणून प्यायल्याने त्याला त्रास सुरू झाला. त्याला तोंडात जळजळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास व्हायला लागल्याने तातडीने अगरताळामधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, त्याच्या जीवाला कोणताही धोका नसून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या तोंडात सुज असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

याचदरम्यान आता स्वत: मयंक अगरवालने सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. त्याने हॉस्पिटलमधील उपचारादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच लिहिले आहे की 'मला आता बरं वाटत आहे, पुनरागमनासाठी तयारी करत आहे. सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी, दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आभार.'

मयंकने नोंदवली पोलिसांकडे तक्रार

दरम्यान, या घटनेनंतर त्यानी जे द्रव्य पाणी म्हणून प्यायले, त्यावर संशय व्यक्त होत आहे. या घटनेबद्दल त्याने त्याच्या मॅनेजरकरवी पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे याबद्दल तपास होईल.

मयंक पुढील सामन्यातून बाहेर

सध्या हॉस्पिटलमध्ये असल्याने मयंक आता कर्नाटककडून पुढील सामना खेळणार नाही. कर्नाटकला रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत पुढचा सामना रेल्वेविरुद्ध सुरतला खेळायचा आहे. दरम्यान, यानंतर 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात मयंक पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

या रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकने आत्तापर्यंत चार सामन्यांपैकी पंजाब आणि त्रिपुराविरुद्ध विजय मिळवला आहे. तसेच गुजरातविरुद्ध पराभव स्विकारला आहे, तर गोव्याविरुद्ध सामना अनिर्णित राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT