Mayank Agarwal Dainik Gomantak
क्रीडा

मयंक अग्रवाल बनला मुंबई कसोटीचा हिरो, VVS लक्ष्मणचा खुलासा

भारताने नुकतेच घरच्या मैदानावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव केला.

दैनिक गोमन्तक

भारताने नुकतेच घरच्या मैदानावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव केला. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात किवी संघाने जोरदार प्रदर्शन करत सामना अनिर्णित ठेवला असला, तरी दुसरीकडे मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. यात टीम इंडियाच्या विजयाचा नायक सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) बनला, यात त्याने शानदार फलंदाजी केली होती. या फलंदाजीने भारताचे माजी फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे पुढील प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) चांगलाच प्रभावित झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील मयंक अग्रवालची दमदार कामगिरी त्याचा आत्मविश्वास दर्शवते, असे मत व्हीव्हीएस लक्ष्मणने नोंदवले.

दरम्यान, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत खेळणारा सलामीवीर मयंक अग्रवाल कानपूरमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने 150 आणि 62 धावांची शानदार खेळी केली. ज्यासाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, “त्याने त्याच्या आत्मविश्वासाला खूप महत्त्व दिले. त्याला पुन्हा फॉर्ममध्ये येताना आणि अशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला. मला वाटते की, तो प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या मानसिकतेने खेळतो त्याच मानसिकतेने तो यावेळी खेळला.

फिरकीपटूंविरुद्ध खेळाचे चाहते

मुंबई कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात मयंकने शानदार फलंदाजी करत धावा केल्या. यादरम्यान त्याने न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनाही चांगले खेळवले. फिरकीपटूंविरुद्ध मयंकची फलंदाजी अतुलनीय असल्याचे लक्ष्मणने म्हटले आहे. “मयांकने काही अपवादात्मक शॉट्स खेळले, खासकरून एजाज पटेलविरुद्ध. लाँग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरवरील षटकार हे त्याच्या डावातील सर्वोत्तम फटके होते.

शिवाय, मयंकने 2018 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते. याआधी भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही त्याची टीम इंडियात निवड झाली होती. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर तो संघासह ऑस्ट्रेलियाला गेला जिथे त्याला मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्याच्या पहिल्या डावात मयंकने 76 धावा केल्या. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या पुढच्या सामन्यात त्याने पुन्हा दमदार खेळी करत 77 धावा केल्या. 2019 मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेने भारताचा दौरा केला तेव्हा मयंकने पुन्हा धावा केल्या. दरम्यान त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले. बांगलादेशविरुद्धही त्याने द्विशतक झळकावले होते. मात्र, त्यानंतर त्याचा फॉर्म खराब होत गेला आणि तो संघाबाहेर बसविण्यात आले. रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा संधी मिळाली, ज्याचा त्याने फायदा उठवला आणि आपला दावा संघात ठोकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT