70+ मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत (डावीकडून) सुवर्णपदक विजेते राकेश शर्मा व माया चावत, रौप्यपदक विजेते हिलरी फर्नांडिस व मॅलाक्विना फर्नांडिस (उजवीकडून अनुक्रमे पहिले व दुसरे), तसेच सामन्याच्या रेफरी. (Master Badminton) Dainik Gomantak
क्रीडा

Master Badminton स्पर्धेत माया, बेग, ओल्गा, बीना यांची चमक

Master Badminton स्पर्धेत 35+ ते 50+ वयोगट टप्पा आजपासून

Dainik Gomantak

पणजी: अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेतील 55+ ते 75+ वयोगटातील टप्पा संपला. त्यात माया चावत हिने तीन, तर महंमद अली बेग, ओल्गा डिकॉस्ता, बीना शेट्टी, गीता नेगी यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके (Gold Medal) जिंकून चमक दाखविली. आता गुरुवारपासून (ता. 23) 35+ ते 50+ वयोगटातील दुसरा टप्पा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये (Manohar Parrikar Indoor Stadium) खेळला जाईल.

55+ ते 75+ वयोगटात गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर याने एक सुवर्ण व दोन रौप्य, डॉ. सिक्लेटिका रिबेलो हिने दोन सुवर्ण व एक ब्राँझ, पर्पेच्युआ जॅकिस हिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. बुधवारी डॉ. सिक्लेटिका रिबेलो हिला 75+ वयोगटातील महिला एकेरीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. 70+ वयोगटातील मिश्र दुहेरीत भारती हेबळे व सुरेश प्रभू वेंगुर्लेकर जोडीलाही ब्राँझपदक मिळाले. 70+ वयोगटातील मिश्र दुहेरीत हिलरी फर्नांडिस व मॅलाक्विना फर्नांडिस यांना रौप्यपदक मिळाले.

35+ ते 50+ वयोगटातील स्पर्धा गुरुवार ते रविवारी या कालावधीत खेळली जाईल. या स्पर्धेत श्रीकांत बक्षी, अमरिश शिंदे, अजय भागवत किरण मकोडे, विक्रम भसीन, एस. बानू, विजय लॅन्सी, जे. बी. एस. विद्याधर, जॉय अँथनी, शालिनी शेट्टी हे प्रमुख खेळाडू आहेत. गोमंतकीय खेळाडूंत गतवर्षी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकलेली संध्या मेलाशीमी, संदीप व कमलेश हे कांजी बंधू, अमित कक्कर, विशाल वेर्णेकर, पराग चौहान, डार्विन बार्रेटो, किशोर रघुबंस, वामन फळारी, विल्फ्रेड जॅकिस, सी. के. शमसुद्दीन व सी. के. अयुब यांचा समावेश आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT