FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: 'राऊंड ऑफ 16'चा थरार आजपासून, जाणून घ्या टाईमटेबल

सामना बरोबरीत राहिल्यास मिळणार 30 मिनिटांचा एक्स्ट्रा टाईम, पेनल्टी शुटआऊटही असणार

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या खऱ्या थरारास आजपासून प्रारंभ होत आहे. राऊंड ऑफ 16 म्हणजेच प्री-क्वार्टर (उपांत्य पुर्व) फेरीला आजपासून सुरवात होत आहे. या फेरीला बाद फेरी किंवा नॉकआऊटर राऊंड असे देखील म्हटले जाते. कारण यात पराभतू झालेला संघ थेट स्पर्धेतून बाहेर फेकला जातो.

पराभूत संघाला पुढील फेरीत जाण्यासाठी दुसरी संधी मिळत नाही. तर विजयी झालेला संघ यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलपर्यंत पोहचू शकतो.

नॉकआऊट राऊंडपासून पेनल्टी शुटआऊटची प्रक्रियादेखील सुरू होईल. म्हणजेच पुर्ण 90 मिनिटांच्या खेळात जर दोन्ही संघांची गोलपाटी कोरी राहिली किंवा गोल बरोबरी झाली तर 30 मिनटांचा एक्स्ट्रा टाईम दिला जाईल. या एक्स्ट्रा टाईममध्येदेखील बरोबरी राहिली किंवा कुणालाही गोल करता आला नाही तर पेनल्टी शुटआऊटवर सामन्याचा निकाल ठरवला जाईल. यात प्रत्येक संघाला पाच पेनल्टी किकची संधी दिली जाईल.

राऊंड ऑफ 16 मध्ये एका दिवसात दोनच सामने होतील. पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता तर दुसरा सामना रात्री साडेबारा वाजता सुरू होईल.

ग्रुप पातळीवर 32 संघांना प्रत्येकी चार अशा आठ ग्रुपमध्ये विभागले होते. या प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ राऊंड ऑफ ग्रुपनिहाय गुणतक्ता जाणून घेऊया. ग्रुप ए मधून नेदरलँड आणि सेनेगल ग्रुप बी मधून इंग्लंड आणि युएसए, ग्रुप सी मधून अर्जेंटिना आणि पोलंड, ग्रुप-डी मधून फ्रान्स आणि ट्युनिशिया हे बाद फेरीत दाखल झाले. ग्रुप-ई मधून जपान आणि स्पेन पुढच्या फेरीत आले. या ग्रुपमध्ये जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला, त्यामुळे बाहेर पडला. ग्रुफ एफ मधून मोरक्को, क्रोएशिया हे संघ वर आले. ग्रुप जी मधून ब्राझिल आणि स्वित्झर्लंड तर ग्रुप एच मधून पोर्तुगाल आणि दक्षिण कोरिया बाद फेरीत दाखल झाले आहेत.

राउंड ऑफ-16 चे वेळापत्रक

3 डिसेंबर

नेदरलँड वि. युएसए रात्री 8.30

अर्जेंटीना वि. ऑस्ट्रेलिया रात्री 12.30 (4 डिसेंबर)

4 डिसेंबर

फ्रान्स vs पोलंड रात्री 8.30

इंग्लंड vs सेनेगल रात्री 12.30 (5 डिसेंबर)

5 डिसेंबर

जपान vs क्रोएशिया रात्री 8.30

ब्राझिल vs दक्षिण कोरिया रात्री 12.30 (6 डिसेंबर)

6 डिसेंबर

मोरक्को vs स्पेन रात्री 8.30

पोर्तुगाल vs स्वित्झर्लंड रात्री 12.30 (7 डिसेंबर)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT