Ghana vs Uruguay: घानावर 2-0 ने मात करूनही उरूग्वे स्पर्धेबाहेर; कोरियाच्या पोर्तुगालवरील विजयाने स्वप्न भंग

अर्रास्केटा याने नोंदवले दोन्ही गोल
Ghana vs Uruguay:
Ghana vs Uruguay:Dainik Gomantak
Published on
Updated on

Ghana vs Uruguay: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत शुक्रवारी ग्रुफ एच मधील दुसऱ्या सामन्यात उरूग्वे संघाने घाना संघावर 2-0 अशी एकतर्फी मात केली. तथापि, याच ग्रुपमधील दक्षिण कोरिया विरूद्ध पोर्तुगाल सामन्यात दक्षिण कोरियाने पोर्तुगालला धक्कादायकरित्या पराभूत केले. त्यामुळे उरूग्वे संघाने विजय मिळवूनही त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तर दक्षिण कोरिया बाद फेरीत गेला आहे.

(FIFA World Cup 2022)

Ghana vs Uruguay:
South Korea vs Portugal: रोनाल्डोच्या पोर्तुगालला धक्का देत दक्षिण कोरिया 'राऊंड ऑफ 16'मध्ये दाखल

ग्रुप एच च्या गुणतक्त्यात दक्षिण कोरिया आणि उरूग्वे संघाचे गुण समान झाले. दोन्ही संघांनी ग्रुप लढतीमध्ये तीन सामन्यांत एक विजय, एक पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांचे गुण 4 आहेत. पण गोल सरासरीत दक्षिण कोरियाने उरूग्वेला मागे टाकले. त्यामुळ दक्षिण कोरियाला पुढील फेरीची संधी मिळाली.

Ghana vs Uruguay:
Vijay Hazare Trophy Final: तब्बल 14 वर्षानंतर सौराष्टची बाजी; महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे शतक वाया

दरम्यान, घानाविरूद्ध उरूग्वेच्या जियोर्जियन डी अर्रास्केटा यानेच दोन्ही गोल नोंदवले. घाना संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे उरूग्वेने हा सामना आरामात जिंकला. पण उरूग्वेला बाद फेरीत पोहचण्यासाठी पोर्तुगालने दक्षिण कोरियाला पराभूत करणेही गरजेचे होते. दक्षिण कोरियाच्या धक्क्याने उरूग्वेचाही स्वप्नभंग झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com