CM Pramod Sawant And PT Usha Dainik Gomantak
क्रीडा

'मोगा आलाय, आता भिवपाची गरज ना', 'शुभंकर' अनावरण कार्यक्रमात पी. टी. उषा आणि CM सावंत काय म्हणाले?

क्रीडा मंत्रालय या स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mascot Launch Ceremony of the 37th National Games Goa 2023: "मोगा आलाय, आता भिवपाची गरज ना. क्रीडा मंत्रालय या स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहे. क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या टीमचे अभिनंदन. भारतीय स्वातंत्रच्या अमृत महोत्सवात आणि गोव्याच्या क्रांती दिनाच्या वर्धापनदिनी हा कार्यक्रम होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. क्रीडा क्षेत्रातील क्रांती साठी गोवा सज्ज आहे. गोव्यातील सर्व संघटनानी यात सहभागी व्हावे." असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा 'शुभंकर' अनावरण कार्यक्रम रविवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

'गोवा देशातील लहान राज्य असले तरी मोठे इव्हेंट आयोजित करण्यात गोवा पुढे आहे. हे या स्पर्धेच्या निमित्त्ताने पुन्हा दाखवून देऊ. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) एकदा गोव्यात झाला आणि त्यानंतर तो नेहमी गोव्यातचं होऊ लागला, इफ्फी गोव्याचाच झाला. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे बाबत असे होईल की नाही माहिती नाही पण आम्ही प्रयत्न मात्र तसेच करू.' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

शुभंकर हा केवळ सिम्बॉल नाही तर खेळाडूंसाठी प्रेरणा - पी. टी. उषा

'स्पर्धेचे खेळाडूंच्या आयुष्यात एक खास स्थान असते. ही केवळ स्पर्धा नाही तर खेळाडूंसाठी खास क्षण आहे. खेळाला कोणतेही बंधने नसतात. खिलाडूवृत्तीबाबत जागरूक राहा. सर्वोच्च उत्तमाचा ध्यास बाळगा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष म्हणून आनंद वाटत आहे.'

'शुभंकर हा केवळ सिम्बॉल नाही तर खेळाडूंसाठी प्रेरणा आहे. या स्पर्धेत अनेक नवीन रेकॉर्ड होतील, गोवा सरकार नवीन बेंच मार्क सेट करेल.' असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा (P. T. Usha) यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT