Mary Kom In Goa: 'देव बरे करु' म्हणत मेरी कोम यांनी जिंकले गोमन्तकीयांचे मन, म्हणाल्या गोवा लवकरच...

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला.
Mary Kom At Mascot Launch Ceremony Goa 2023
Mary Kom At Mascot Launch Ceremony Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Mary Kom At Mascot Launch Ceremony Goa 2023: गोवा लवकरच स्पोर्ट्स हब होईल, असा विश्वास ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि माजी खासदार मेरी कोम यांनी व्यक्त केला. रविवारी गोव्यात पार पडलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 'शुभंकर' अनावरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

जीवनात स्वयं प्रेरणा खूप महत्वाची आहे. गोवा सरकार उत्साही असून, गोव्याने अपेक्षा उंचावल्या आहेत, असेही मेरी कोम म्हणाल्या. मेरी कोम यांनी यावेळी "हांव गोंयाचेर मोग करता, देव बरे करु" असे म्हणत कोकणी भाषेत संवाद ही साधला.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, महान अॅथलीट व भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा आदी उपस्थित होते.

गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा (37th National Games) होणार आहे. यात 43 खेळांचा समावेश असून राज्यातील 28 केंद्रांवर सामने होतील. 14 मे रोजी स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण झाले होते.

Mary Kom At Mascot Launch Ceremony Goa 2023
Moga Is Finally Here: अखेर शोध थांबला.... 'मोगा' जल्लोषात अवतरला...

कार्यक्रमाची सुरवात स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी गेट सेट गोवा हे रॅप सॉन्ग देखील सादर करण्यात आले.

या स्पर्धेतील 40 खेळ गोव्यात खेळले जातील. सायकलिंग, नेमबाजी व गोल्फ या खेळाच्या साधनसुविधा राज्यात नसल्याने त्यांचे आयोजन राज्याबाहेर होईल.

अन् 'मोगा' जल्लोषात अवतरला...

मागील काही दिवसांपासून राज्यात मोगा कोण, कधी येणार? याची चर्चा रंगली होती. रविवारी अखेर जल्लोषात मोगा सर्वांसमोर अवतरला.

गोवा क्रांती दिनाचे निम्मित साधून शेकडो गोवेकरांच्या उपस्थितीत मोगा गोवेकरांच्या समोर अवतरला. रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या जल्लोषात या स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण करण्यात आले. इंडियन बायसन तथा गवा हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. हा गोव्याचा राज्य प्राणी देखील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com